आत्मशिस्त दाखवून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये घट झाली आहे, ती टिकून रहावी याकरिता फटाके न लावता दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना केलं.

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये घट झाली आहे, ती टिकून रहावी याकरिता फटाके न लावता दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना केलं. आपण बंदी घालणार नाही आणि परंतु फटाक्यांच्या प्रदूषणामुळे कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होऊ शकते, याकरिता  लोकांनी आत्मशिस्त दाखवून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असं आवाहन त्यांनी केलं.

जगातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे ,महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू नये, याकरिता आतापासूनच काळजी घेण्याची गरज आहे,अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसोबत संवाद साधला आहे.त्यावेळी त्यांनी राज्यात करोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रार्थनाही केली आहे.

दिवाळीनंतरचे पंधरा दिवस निर्णायक..काळजी घ्या
महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे कमी होत असताना ठाकरे यांनी तीर्थ स्थळे पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले आणि याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे दिवाळीनंतर तयार करणार असल्याचे सांगितले.
राज्यात करोना संसर्गाचा वेग आता कमी होत आहे. पण, दिवाळीच्या काळात कोरोना पुन्हा डोके वर काढण्याची भीती आहे. यामुळे दिवाळीत फटाक्यांचा
 वापर न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. फराळ करा, पणत्या लावा परंतु फटाके न वाजवता सण साजरा करा. राज्यात करोनाची दुसरी लाट
 येऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेणं महत्त्वाचे असल्याचंदेखील मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या