कोरोनानंतर मुलांमधील ‘पिम्स’ आजारासंबंधी डॉक्‍टरांचा सल्ला

सम्राट कदम
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना अवयव दाहकता (पेडियाट्रीक मल्टिसिस्टीम इन्फ्लामेटरी सिंड्रोम, पिम्स) या आजाराने ग्रासण्याची शक्‍यता आहे. परंतु, वेळेवर उपचार घेतल्यास या आजाराला घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले आहे. 

पुणे: कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना अवयव दाहकता (पेडियाट्रीक मल्टिसिस्टीम इन्फ्लामेटरी सिंड्रोम, पिम्स) या आजाराने ग्रासण्याची शक्‍यता आहे. परंतु, वेळेवर उपचार घेतल्यास या आजाराला घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले आहे. 

जगभरामध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये कोरोनातून बरे झालेल्या किंवा कोरोनासदृश्‍य लक्षणे दिसणाऱ्या मुलांमध्ये अवयव दाहकता (पिम्स) हा आजार पाहायला मिळाला आहे. गुजरात, मुंबई, पुणे आदी शहरांत काही मुलांना हा आजार झाल्याचे खासगी रुग्णालयांतील डॉक्‍टरांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध वंशातील मुलांमध्ये पिम्सच्या प्रसार आणि उपचारासंबंधी शोधनिबंध नुकताच एल्सवेअरच्या इक्‍लिनिकल मेडिसीन या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

पालकांनी काय करावे?
पाल्याचे वय १८ पेक्षा कमी आणि कोरोना होऊन गेल्यास त्याच्यावर दोन ते तीन आठवडे लक्ष ठेवावे
तीव्र ताप आणि इतर लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्‍टरांशी संपर्क साधावा
पिम्स हा आजार संसर्गजन्य नसल्याने आणि उपचार उपलब्ध असल्याने धोका नाही
आजारातून बरे झाल्यानंतरही पुढील सहा ते आठ महिने अवयवांच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवावे

पिम्स होण्याचे कारण
कोरोना उपचारादरम्यान विकसित झालेल्या प्रतिकारशक्तीविरुद्ध शरीराच्या प्रतिक्रियेतून हा आजार होतो. 

संबंधित बातम्या