कुत्र्याला जिवंत जाळले; माणुसकीला काळिमा फासणारी ठाण्यातील घटना

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

 माणुसकीला काळिमा फासणारी अशीच एक घटना अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. महाराष्ट्रातील ठाणे शहरात एका मोकाट कुत्र्याला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी केरळ मध्ये स्फोटक भरून ठवलेले अननस खाल्ल्यामुळे हत्तीचा मृत्यू झाला होता आणि देशभरात हा मुद्दा चर्चेत आला होता. समाजातील अशा काही घटना पाहून माणसातली माणुसकी कमी झाली असल्याचा प्रत्यय नेहमीच येत असतो.  माणुसकीला काळिमा फासणारी अशीच एक घटना अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. महाराष्ट्रातील ठाणे शहरात एका मोकाट कुत्र्याला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.  (The dog was burned alive in Thane)

मंगळवारी सायंकाळी मसनवाडा येथे काही लोकांनी परिसरातील एका मोकाट कुत्र्याला (Dog) जिवंत जाळल्याची माहिती मिळाल्याचे सिटीझन फॉर अनिमल प्रोटेक्शनच्या (Citizen for Animal Protection) सदस्यांकडून मिळाली आहे. त्यानंतर या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत असणाऱ्या कुत्र्याला पशु वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीररित्या जखमी झालेल्या या कुत्र्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सिटीझन फॉर अनिमल प्रोटेक्शन फाउंडेशनच्या 20 वर्षीय सदस्याने राबोडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे समजते आहे.

"घरी परतणाऱ्या मजुरांकडून महाराष्ट्र पोलीस करता आहेत वसुली"

भारतीय दंड संहिता (IPC)च्या कलम 429 नुसार गुराढोरांना मारहाण करणे, किंवा त्यांना जखमी करणे आणि क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची तरतूद केली गेली आहे. 

संबंधित बातम्या