त्याच्या वेबसीरिज बघण्याच्या सवयीने वाचवले ७५ लोकांचे प्राण...

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

कुणालने दाखवलेल्या कमालीच्या समयसुचकतेमुळे ७५ लोकांचे प्राण वाचले. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांसहित इमारतीत राहणाऱ्यांनी त्याचे कौतूक करत आभारही मानले.

मुंबई- डोंबिवलीत काल इमारत कोसळताना एका मुलाने समझदारी दाखवत तब्बल 75 लोकांचे प्राण वाचवले आहे. वेबसीरिजचे अक्षरश: व्यसन असणारा हा मुलगा रात्र-रात्र वेबसिरीज बघतो. आज पहाटेही तो वेबसीरिजचे बघत असताना याच दरम्यान इमारत कोसळत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने समयसुचकता दाखवताना इमारतीमधील सर्वांना झोपेतून उठवत बाहेर काढले.     

लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या तरूणाचे नाव कुणाल मोहिते असून तो १८ वर्षांचा आहे. गुरूवारी पहाटे चार वाजता इमारत पडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळपर्यंत तो वेबसीरिजचे बघत होता. त्याने उठून बघितले असता त्याच्या फ्लॅटच्या किचनची भींत कोसळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी त्याने तात्काळ जोरात आवाजात ओरडत इमारतीमधील लोकांना जागे करत त्यांना बाहेर पडण्याचे आवाहन केले. लोकही जागे होत लगेच इमारतीच्या बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 

कुणालने दाखवलेल्या कमालीच्या समयसुचकतेमुळे ७५ लोकांचे प्राण वाचले. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांसहित इमारतीत राहणाऱ्यांनी त्याचे कौतूक करत आभारही मानले. सुमारे 42 वर्षे जुनी इमारत कोसळण्यापूर्वी जर त्यांना कुणालने जागे केले नसते तर आज त्यांनी प्राण गमावले असते.  

संबंधित बातम्या