संकटाच्या काळात राजकारण करू नका; नितीन गडकारींचा पक्षनेत्यांना घरचा आहेर  

दैनिक गोमंतक
सोमवार, 10 मे 2021

या संकटाच्या काळात धर्म, जात,पक्ष, पंथ विसरून सध्या रुग्णांना मदत करा. कठीण काळात थोडी मदत केली तर भविष्यात बोर्ड आणि झेंडे लावायची गरज भासणार  नाही.

नागपूर :  राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून विरोधी पक्ष भाजपा चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यसरकारच्या कामावर टीका करण्याची एकही संधी भाजपा नेत्यानी सोडली नाही. अशा वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याकग पक्ष नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. कोरोना वरून सुरू असलेल्या राजकरणावरून  नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या नेत्याचे कानही टोचले आहेत. (Don’t do politics in times of crisis; Nitin Gadkari) 

महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे कोरोनाचे थैमान तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा...

नागपूरमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी पक्षाच्या बैठकीला त्यांनी संबोधित केलं. यावेळीमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. या संकटाच्या काळात धर्म, जात,पक्ष, पंथ विसरून सध्या रुग्णांना मदत करा. कठीण काळात थोडी मदत केली तर भविष्यात बोर्ड आणि झेंडे लावायची गरज भासणार  नाही. लोकांना सेवेचे राजकारण केलेले आवडत नाही. कोणताही पक्षभेद न करता सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतलीत तर लोकही ही सेवा लक्षात ठेवतील. अशा शब्दांत मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षनेत्यांना सुनावले आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यात कोरोनातून बरे होणारे रुग्ण वाढले

त्याचबरोबर, राजकारण म्हणजे केवळ  सतेत राहणे नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण यालाच राजकारण म्हणतात.  या कठीण प्रसंगात गरिब-गरजूंच्या मागे धर्म, पक्ष विसरुन मदत केली तर यांचे फळ पक्षाला नक्कीच मिळेले. कोरोना संकटाच्या या काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलात तर ते ही तशीच साथ देतात. असेही यावेळी गडकरिंनी स्पष्ट केले.

तसेच माझ्यात प्रतीपिंडे (अँटीबॉडिज) तयार झाली आहेत. आता मला कोरोनाची लागण होणार नाही, असं समजून कोणीही निष्काळजीपणा करू नका, आजही अनेक नगरसेवक, कार्यकर्ते याच विचाराने बेजबाबदारपणे फिरत आहेत. पण एक लक्षात ठेवा, कार्यकर्ते असतील तरच पक्षाच काम होईल, त्यामुळे कार्यकर्त्यांना गमावणं पक्षाला परवडणारं नाही. त्यामुळे स्वतःसोबत कार्यकर्त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणेही आवश्यक आहे. तसेच, आधी आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, आणि त्यानंतर पक्ष आणि समाजाची कामे करा, अशा सूचना यावेळी गडकरी यांनी पक्षाला दिल्या आहेत.

संबंधित बातम्या