सोन्याच्या हव्यासापोटीच सावंतवाडीत दुहेरी हत्याकांड !

सावंतवाडी (Sawantwadi) शहरातील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.
सोन्याच्या हव्यासापोटीच सावंतवाडीत दुहेरी हत्याकांड !
CrimeDainik Gomantak

महाराष्ट्रात (Maharashtra) गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. यातच आता सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. दागिन्यांच्या हव्यासापोटी कुशल उर्फ विनायक नागेश टंकसाळी (Vinayak Nagesh Tanksali) याने हे घृणास्पद कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हत्याकांडानंतर दोनवेळा बेपत्ता झालेला तरुण हाच असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी मधील उभाबाजार परिसरात राहणाऱ्या निलीमा खानविलकर आणि शालिनी सावंत यांच्या गळ्यावार वार करुन खून करण्यात आला. मागील दोन आठवड्यापूर्वीच हा धक्कादायक प्रकार घडला होता. या खुनाच्या दरम्यान अनेकांची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर अखेर याच तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते.

Crime
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, चकमकीत नक्षलवाद्यांचा बडा नेता मारला गेल्याची शक्यता

शिवाय, पोलिसांनी चौकशीसाठी बोलविल्यानंतर कुशल उर्फ विनायक टांकसाळी यांनी विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेथूनचा काही दिवसानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र पुन्हा तो बेपत्ता झाला. दरम्यान त्याच्या मोबाईलचे लोकशन आंबोली घाटाजवळ मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून काही हाती आले नसल्याचे समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com