Maharashtra Corona Update: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रात्री कडक निर्बंध; तर विकेंड पूर्ण लॉकडाउन

दैनिक गोमन्तक
रविवार, 4 एप्रिल 2021

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच होते आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विकेंडला कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळ पर्यंत महाराष्ट्रात कडक संचारबंदी लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून 'विकेंड लॉकडाउन'वर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकुळ; रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी म्हणून राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रात सोमवार ते शुक्रवार पर्यन्त रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण कडक संचारबंदी राहणार आहे. तर तेच दिवसभरात राज्यात जमावबंदी राहणार असल्याचे समजते. शिवाय राज्यातील ही अंमलबजावणी उद्यापासून लागू होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले आहे. 

Mansukh Hiren Case : सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ 

तसेच, नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात विकेंडला संपूर्ण लॉकडाउन राहणार असल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील 'विकेंड लॉकडाउन' हा शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, महाराष्ट्रातील सर्व रेस्टोरंट, बार, मॉल्स हे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली. याबाबत बोलताना, संपूर्ण कडक लॉकडाउन होण्याची शक्यता निर्माण होऊ नये म्हणूनच हा कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.     

 

 

संबंधित बातम्या