कोरोनाचा धुमाकूळ; महाराष्ट्रातील पुण्यात 'शॉर्ट लॉकडाऊन' जाहीर  

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाची नवी प्रकरणे वाढत आहेत. त्यातल्या त्यात सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही राज्यातील परस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाची नवी प्रकरणे वाढत आहेत. त्यातल्या त्यात सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही राज्यातील परस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. आणि या बैठकीनंतर राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत. या परिस्थिती मध्ये राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता अधिक तीव्र झाली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संबोधनाबद्दल माहिती दिली आहे. शिवाय यावेळेस त्यांनी मोठी घोषणा करू शकतात, असे म्हटले आहे. 

देशात मध्यंतरी कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र त्यानंतर देशातील कोरोनाच्या नव्या लाटेचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पुण्यात नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी 3 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आणि पुढील शुक्रवारी पुन्हा या निर्णयाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे समजते. तसेच, संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत हा नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये लादलेल्या नाईट कर्फ्यूच्या तुलनेत महाराष्ट्रातील पुण्यात हा सर्वात मोठा नाईट कर्फ्यू असेल.

सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला शरद पवार यांचे नाव!

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज याबाबतची माहिती दिली आहे. याशिवाय पुढील सात दिवस पुण्यातील सर्व बार, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाहीतर पुण्यात विवाह आणि अंत्यसंस्कार वगळता कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. व 50 पेक्षा जास्त लोकांना विवाहात आणि अंत्यसंस्कारात 20 हून अधिक जणांना सहभागी होता येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिवाय धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. 

,दरम्यान, महाराष्ट्रात पुणे, नागपूर आणि मुंबई ही मोठी शहरे चिंतेचा विषय बनली आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात 43 हजारहून अधिक कोरोनाची नवी प्रकरणे आढळून आली आहेत. तर संपूर्ण देशभरात ही संख्या 81,000 च्या वर पोहचली आहे. 

संबंधित बातम्या