धक्कादायक! ऑक्सिजन अभावी मुंबईत 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमेडीसीव्हीर इंजेक्शननंतर आता ऑक्सिजनची सुद्धा  कमतरता भासत असल्याचे दिसून येते आहे. त्यातच आज मुंबईतील नालासोपारामध्ये कोविड रुग्णांचा ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करताना दिसते आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा आरोग्य यंत्रणेवर मोठा भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणा अपूरी पडत असल्याचे दिसून येते आहे. रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमेडीसीव्हीर इंजेक्शननंतर आता ऑक्सिजनची सुद्धा  कमतरता भासत असल्याचे दिसून येते आहे. त्यातच आज मुंबईतील नालासोपारामध्ये कोविड रुग्णांचा ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Due to lack of oxygen 7 patients died in Mumbai )

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लागू होऊ शकतो लॉकडाऊन

मुंबईतील नालासोपारा (Nalasopara) येथील कोरोना उपचार केंद्रातील 7 रुग्णांचा ऑक्सिजनच्या (Lack of Oxygen) अभावामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रुग्णालयावर आरोप करत ऑक्सिजनच्या अभावामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. तर रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे झाला नसून वृध्दावस्थेमुळे व इतर आजारांमुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालाच्या वतीने सांगण्यात येते आहे.तसेच आसपासच्या मोठ्या परिसरात गंभीर रुग्णांसाठी हा एकच दवाखाना आहे,असे रुग्णालय प्रशासनकडून सांगण्यात येते आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहिती नुसार, सकाळी ३ वाजता ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता. मृतांचे नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनामध्ये बिल देण्यावरून वाद झाले होते, तरी मृतांच्या नातेवाईकांना जर या प्रकरणी तक्रार दाखल करायची असेल तर ते करू शकतात. 

रुग्णालय प्रशासनाने याबद्दल स्पष्टीकरण देताना मृत रुग्णांची प्रकृती पहिल्यापासून नाजूक होती, तसेच ते वेगवेगळ्या गंभीर आजारांनी त्रस्त होते असे सांगितले आहे.  दरम्यान या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे समजते आहे. 

 

संबंधित बातम्या