कोरोना काळात मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राला केली मोठी मदत

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. याच पार्शवभूमीवर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राला या परीस्ठीमध्ये मोठी मदत केली आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत देशातील अनेक राज्यांत परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. कोरोना विषाणूचा माणसाच्या श्वसनप्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असल्याने कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासते. महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. याच पार्शवभूमीवर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राला या परीस्ठीमध्ये मोठी मदत केली आहे.( During the Corona period, Mukesh Ambani has been a great help to Maharashtra)

राज्यातील वेगेवगेळ्या कोरोना रुग्णालयांत उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा भासतो आहे. याच दरम्यान मुंबईच्या (Mumbai) एका रुग्णलयात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या या गंभीर परिस्थिती मध्ये मदत म्हणून मुकेश अंबानी यांनी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहिती नुसार मुकेश अंबानी जामनगर येथील रिफायनरी मधून १०० टन ऑक्सिजन महाराष्ट्रातील रुग्णालयांना पुरवणार आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रिलायन्स कडून राज्याला १०० टन ऑक्सिजन मिळाला असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचे कळवले होते. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी केलेल्या ऑक्सिजनच्या मदतीमुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार असल्याचे समजते आहे. 

संबंधित बातम्या