कोकण: देवरुख आणि साडवलीत भूकंपाचे धक्के

कोकण: देवरुख आणि साडवलीत भूकंपाचे धक्के
Earthquake.jpg

गेल्या काही दिवसांपासून निसर्गात (Nature) होणाऱ्या बदलांमुळे त्याचे मोठे परिणाम दिसून येत आहेत. त्यातच तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) देखील मोठे बदल झाले आहेत. मागच्या आठवड्यात आलेल्या वादळातून परिस्थिती सावरत असतानाच सकाळी 9 वाजता कोकणातील संगमेश्वरमधील (Sangameshwar)  देवरुख (Devrukh), साडवली (Sadavali) भागात भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसल्याची माहिती मिळते आहे. धक्क्याचे स्वरूप सौम्य असल्याने विशेषतः उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना हा धक्का जाणवला असल्याचे समजते आहे. (Earthquake in Devrukh and Sadavali in Konkan)

घरातील सामान हालल्याचे जाणवले...

नागरिकांना घरातील सामान हलण्याचा आवाज आला. रॅक आणि लोखंडी भांडे हलण्याच्या आवाजाने नागरिकांना या धक्क्याची  जाणीव झाली. हा धक्का सौम्य असल्याने चिंतेचे कारण  नसले तरी,  एकीकडे कोरोना आणि त्यातच आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात जोरदार फटका बसलेला असतानाच भूकंपाच्या या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com