Maharashtra: कोल्हापूरसह सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

महाराष्ट्राच्या (Maharashtra) कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला असल्याचे वृत्त समोर येत आहे.
Maharashtra: कोल्हापूरसह सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के
Earthquake shakes Solapur and Kolhapur Dainik Gomantak

महाराष्ट्राच्या (Maharashtra) कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला असल्याचे वृत्त समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमध्ये रात्रीच्या १२ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

Earthquake shakes Solapur and Kolhapur
कोकणवासीयांना खुशखबर! चिपी विमानतळाला मिळणार राष्ट्रीय दर्जा

कोल्हापूरमध्ये भूकंपाच्या या धक्क्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.49 वाजता कोल्हापूरपासून 19 किलोमीटर पश्चिमेला भूकंपाचे धक्के जाणवले.

या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने देखील या संदर्भात वृत्त दिले आहे. कोल्हापूरमध्ये रात्री झालेल्या भूकंपाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांनी भूकंपाचे धक्के बसताच घराबाहेर पळ काढला.

तसेच सोलापूर मध्ये देखील भूकंपाचा अतिसौम्य धक्का जाणवला आहे. रात्री 11 वाजून 57 मिनिटांनी शहराच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com