पर्यावरणस्नेही सायकलपटू नितांतची युनिसेफने घेतली दखल

पर्यावरणस्नेही सायकलपटू नितांतची युनिसेफने घेतली दखल
nitant 1.jpg

सिंदुदुर्ग(Sindudurg)जिल्ह्यातील वरवडे-फणसवाडी(Phanaswadi) गावाचा रहिवासी आणि एस. एम. हायस्कूलमध्ये दहावीत शिकत असलेल्या पर्यावरणस्नेही (Eco-friendly) सायकलपटू (Cyclists) नितांत राजण चव्हाण (Nitant Rajan Chavan) याची दखल जागतिक संघटना असलेल्या युनिसेफने (UNICEF) घेतली आहे. नितांतवरील विशेष लेखाचा समावेश चरखा युनिसेफ या प्रकल्पाच्या वेब पोर्टलवर जागतिक पर्यावरण दिनी प्रसिध्द करण्यात आला आहे.  नितांत सायकल चालवण्यातून पर्यावरणाचा संदेश देतो. 

नितांत इयत्ता सहावीमध्ये असताना राष्ट्रदलाने आयोजित केलेल्या मिरज-राधानगरी-फोंडा-मालवण-देवगड-वैभववाडी ते मिरज या सायकल रॅलीमध्ये सहभागी होऊन निंतातने पाच दिवसामध्ये 480 कि. मी चा सायकल प्रवास केला होता. कणक रायडर्स बरोबर त्याचा सायकलिंगचा प्रवास सुरु असतो.

नितांतने स्वता: सह अनेक मित्र मैत्रीणींना आपल्या सायकलिंगच्या प्रेमात पाडले आहे. तसेच नितांत NCC चा सिनिअर कॅडेट ही आहे. सायकलिंगने पर्यावरण संवर्धानाचा संदेश नितांत देत असतो. नितांत चव्हाण याच्या पर्यावरणस्नेही कामाची जागतिक पर्यावरण दिनी चरखा युनिसेफच्या प्रमुख अलका गाडगीळ (Alka Gadgil) यांनी दखल घेतली आहे. 'युथ की आवाज' (Voice of Youth)  या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या संस्थेनेही चरखा युनिसेफ या वेब पोर्टलवरील नितांतचा लेख आपल्या अधिकृत असणाऱ्या वेबसाईटवरुन प्रसिध्द केला आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com