Hasan Mushrif ED Raid: हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची छापेमारी

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी ईडी आणि आयटी विभागाने छापेमारी केली आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifDainik Gomantak

ED and IT Raid On Hasan Mushrif Home: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सकाळी साडेसहा वाजेपासून ईडी आणि आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापा मारला असून त्यांच्या संपत्तीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या राजकीय नेत्याच्या घरी छापेमारी झाल्याची घटना समोर आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ईडी आणि आयकर विभागाचे तब्बल 20 अधिकारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी आले. त्यानंतर पोलिसांकडून मुश्रीफांच्या घराची सुरक्षा वाढवून अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे.

कोणत्याही बाहेरील व्यक्तीस आत येण्यास आणि बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.

समर्थक आणि कार्यकर्ते आक्रमक

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी केल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर आणि कागलमध्ये आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप आणि ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर आरोप केल्यानंतर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्यामुळं राज्यात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com