विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयांबाबत केली मोठी घोषणा 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयाबाबत मोठी घोषणा केली आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयाबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. राज्यातील महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील काही सुरक्षतेच्या गाईडलाईन्स दिल्या आहेत. आणि त्यानुसारच महाविद्यालयाच्या परीक्षा ऑफलाईन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. शिवाय या नियमांचे पालन करणे बंधणकारक असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. 

शेतकरी आंदोलनासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालये 50 टक्के  विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तसेच या वर्षी विद्यार्थ्यांना 75 टक्के हजेरी बंधनकारक राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र महाविद्यालये सुरू होताना कोरोना बाबतच्या नियम पाळावे लागणार असल्याचे आणि प्रॅक्टिकल बाबतचा निर्णय महाविद्यालये घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय वसतिगृहाबाबतचा निर्णय देखील महाविद्यालयेच घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  

राहुल गांधींचा हल्लाबोल; अर्थसंकल्प, शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर डागली तोफ

उदय सामंत यांनी आज केलेल्या घोषणेनंतर परीक्षा कधी होणार, कशा होणार, महाविद्यालये कधी चालू होणार या सगळ्या प्रश्नांना पूर्ण विराम मिळाला आहे. गेल्या वर्षी मार्च पासून कोरोना, लॉकडाउन मुळे महाविद्यालये व शाळा बंद ठेवण्यात आली होती. त्या नंतर ऑनलाइन पद्धतीने शिक्षण चालू करण्यात आले होते.  पण आता हळूहळू कोरोना प्रादुर्भाव कमी होताना दिसत असल्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या