दहावी-बारावीची परिक्षा ऑफलाइनच! विद्यार्थ्यांना पेपरसाठी मिळणार जास्त वेळ

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

शिक्षणमंत्री वर्षा दायकवाड यांनी आज दहावी बारावीच्या परिक्षेसंदर्भात महत्वपूर्ण सुचना दिल्या आहेत. आणि ही परिक्षा आपआपल्या शाळेत किंवा महाविद्यालयात होणार आहे.

मुंबई: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दहावी बारावीच्या परिक्षेसंदर्भात महत्वपूर्ण सुचना दिल्या आहेत. या परिक्षा ऑफलाइन पध्दतीनेच होणार असं त्यांनी सांगितलं. आणि ही परिक्षा आपआपल्या शाळेत किंवा महाविद्यालयात होणार आहे. अपवादात्मक शाळेत किंवा महाविद्यालयात जागा आपूरी पडल्यास शेजारील शाळेत ही परिक्षा घेतली जाणार असे गायकवाड यांनी सोगितले. 23/4/2021 ते 21/5/2021 दरम्यान दहावीच्या परिक्षा होणार आहे. आणि 22/5/2021 ते 10/6/2021 दरम्यान बारावीची परिक्षा होणार आहे. कला विणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हे नियम सारखेच असणार आहे.

मुलांचा लिखाणाच्या दृष्टिने विचार करता पेपरचा वेळ तीन तासाऐवजी सोडातीन तासाचा करण्यात आला आहे, त्याचबोरबर अपंग आणि मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी हा वेळ एक तासाने वाढविण्यात आला आहे. ही परिक्षा अर्धा तास आधी सुरू करण्यात येणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक परिक्षेसाठी कमी वेळ मिळाल्याने दाहावी बारावीच्या प्रारत्याक्षिक परिक्षा असायंमेंट पद्धतीने होणार आहे. आणि हे असायमेंट लेखी परिक्षेनंतर 15 दिवसाच्या आत शाळेत सादर करावे लागणार आहे. या परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास या प्रात्याक्षिक परिक्षेला 15 दिवसाचा अधिक वेळ देण्यात येइल, असं त्या म्हणाल्या.

त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असेल त्यांची विशेष परिक्षा जून महिन्यात घेण्यात येइल पण त्याची परिक्षा केंद्रे शहरी भागात असणार. दहावी बाराविच्या प्रात्याक्षिक परिक्षा लेखि परिक्षेनंतर होणार आहे. ठरवलेल्या वेळापत्रकानुसार या परिक्षाा होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

पालक आणि विद्यापर्थ्यांना आवाहन

कोणत्याही अफवाना बळी पडू नका, शालेय शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरूनच परिक्षेसंदर्भातील माहिती घ्या. व्हॉट्सप वर येणारे संदेश फेक असू शकतात. तेव्हा शिक्षकांनी दिलेल्या आणि शासनाच्या वेबसाइटवर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवा असे आवाहन त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.

 

 

संबंधित बातम्या