मोठा निर्णय! पहिली ते आठवीचे विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात; तेही परीक्षेविना

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

महाराष्ट्र राज्यातील पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आरटीई अंतर्गत येतात त्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे.

मुंबई: राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रसार झपाट्यान वाढत आहे. कालच झालेल्या बैठकीमध्ये पुण्यात मिनी लॉकडाउन लावण्यात आले आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची परीस्थिती पाहता महाराष्ट्रात लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला आहे.
अशातच शेक्षणिक विद्यार्थ्यांना प्रश्न पडले होते. मागिल वर्षापासून पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांच्या शाळा ऑनलाइन सुरू होत्या.  मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आल्या नाही. कोरोनाच्या याच पार्श्वभूमीवर अजुनही कोरोनाचा प्रसार जास्त होत असल्यानं सलग दुसऱ्या वर्षीही वार्षिक मुल्यमापन परीक्षा होणार नसल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.(Education Minister Varsha Gaikwad said Students of class 1st to 8th will get admission in the next class without giving examination)

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशभरात पुन्हा चिंताजनक परिस्थिती 

वर्षभरापासून चौथीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या. तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला गेला. या शाळा काही ठिकाणी सुरु झाल्या तर काही ठिकाणी शाळा सुरू करणं शक्य झालं नाही. आणि अशात अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. शालेय मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सातत्यानं शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले गेले असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसंच पहिली ते आठवीच्या वार्षिक मुल्यमापनाबाबतची माहिती सुद्धा यावेळी गायकावड यांनी दिली. 

मी मास्क घालत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा चिमटा

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराचे मुल्यमापन करणे गरजेचे आहे. मात्र यंदाही शालेय मुल्यमापन करणं शक्य नाही. राज्यातील पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आरटीई अंतर्गत येतात त्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

संबंधित बातम्या