शिंदेंना मुख्यमंत्री करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

''महाराष्ट्राचं सरकार बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचारावर चालणार असेल''
Devendra,  Uddhav
Devendra, Uddhav Dainik Gomantak

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी फडणवीस यांनी यांनी असे म्हटले आहे की, भाजप कोणत्या ही पदासाठी लढत नाही, तर भाजप ची ही लढाई एका विचारांची, तत्त्वांची लढाई आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील सरकार कार्यरत राहील, तर अनेक प्रश्नांना एका निवडीने उत्तर दिण्यासाठी शिंदेंना मुख्यमंत्री करत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केल्याची चर्चा राजकिय वर्तूळात रंगली आहे. ( Eknath Shinde Maharashtra New Chief Minister Devendra Uddhav Thackeray )

Devendra,  Uddhav
ऑटो चालक एकनाथ शिंदे घेणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

फडवीस पुढे बोलताना सांगितले की, आपण स्वत: या मंत्रीमंडळात सहभागी असणार नाही. आपण केवळ या सरकारला आवश्यक ते पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी ही आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी ते म्हणाले की, प्रथमत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या सहकार्यामूळेच आपण हा प्रवास करु शकलो असं ही ते म्हणाले.

Devendra,  Uddhav
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस 'किंग मेकर' च्या भूमिकेत

तसेच नवे सरकार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारावर चालणारं असेल बाळासाहेबांच्या विचाराचे राज्य यापूढे महाराष्ट्रातील सरकार असेल असे ते म्हणाले. या निवडणीमूळे फडणवीस यांनी महाराष्ट्रातील नाराज शिवसैनिकांना आपल्याकडे वळवण्यासाठीचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला गेला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी माझा शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला काहीही वाटणार नाही असं ते म्हणाले होते.

आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही याबाबत वक्तव्य केले होते. या सर्वाला फडणवीस यांनी शिंदे यांची निवड करत सर्व प्रश्नांचे उत्तर दिले आहे. त्यामूळे शिंदे यांची निवड ही ठाकरे सेनेच्या वर्मावर घाव घालणारी ठरली आहे. अशी ही चर्चा सुरु आहे. या पत्रकार परिषदेस देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. तसेच शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदारांपैकी काही नेते ही उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com