मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच घरी परतले; बॅन्ड वाजवून पत्नीने केले स्वागत

महाराष्ट्रात प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली राजकीय कोंडी संपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात शांतता नांदताना दिसत आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeDainik Gomantak

महाराष्ट्रात (Maharshtra) प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली राजकीय कोंडी संपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात शांतता नांदताना दिसत आहे. मात्र, एकमेकांविरोधातील भाषणबाजी आणखी सुरूच आहे. महाराष्ट्रात उलथापालथ झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले, विधानसभा अध्यक्षांची निवड देखील झाली. या सगळ्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde New CM Of Maharashtra) झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी पोहोचले आहेत. जिथे त्यांच्या पत्नीने त्यांचे जंगी स्वागत देखील केले आहे. (Eknath Shinde returned home for the first time after becoming the Chief Minister)

CM Eknath Shinde
President Election: शिवसेना द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देणार का? शिवसेनेच्या खासदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

पत्नी लतादीदींनी पती सीएम एकनाथ शिंदे यांचे बॅण्ड वाजवून स्वागत केले आहे. यावेळी त्या खूप आनंदी दिसत होत्या. या स्वागत कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळपास तीन आठवडे घराबाहेर राहिले होते. मंगळवारी त्यांचे ठाण्यातील निवासस्थानी आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 9.30 च्या सुमारास ठाण्यातील आनंद नगर येथील त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांचे स्वागत केले.

यावेळी कार्यकर्ते आणि त्यांचे चाहतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मला तीन आठवड्यांपूर्वी शिंदे यांनी आमदारांसह आधी सुरत गाठले, त्यानंतर तेथून आसामची राजधानी गुवाहाटी येथे पोहोचले आणि शेवटी गोव्यातही आमदारांसह मुक्काम ठोकला होता. या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा झाल्या आणि रंगल्या देखील. आरोप-प्रत्यारोपांची मालिकेला सुरुवात झाली.

CM Eknath Shinde
Khwaja Sayyad Chishti Murder: नाशिकमध्ये मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या

या काळात पक्षांच्या बैठकाही खूप झाल्या. महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) सहभागी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सरकार वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न देखील केला. पण सरकार टिकू शकले नाही आणि शेवटी उद्धव ठाकरेंनी आधी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नंतर फ्लोअर टेस्टमध्ये शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्याने सरकार देखील स्थापन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com