Konkan Railwayचे 700 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण लवकरच

गोव्यातील मडगाव स्थानकाजवळच्या कामाने वेग घेतला आहे
Konkan Railwayचे 700 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण लवकरच
Konkan Railway Dainik Gomantak

फातोर्डा: कोकण रेल्वे (Konkan Railway) कॉर्परेशन लिमिटेडतर्फे अंदाजे 1100 कोटी रुपये खर्चून 700 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण लवकरच करण्यात येईल. या कामास यापूर्वीच सुरवात झाली असून गोव्यातील मडगाव स्थानकाजवळच्या कामाने वेग घेतला आहे, अशी माहिती उपमहाप्रबंधक बबन घाटगे यांनी दिली आहे.

डिसेंबर 2021 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. एरव्ही हे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणार होते, पण कोविड महामारीमुळे उद्‌भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे हे काम एक वर्ष लांबणीवर पडले, असेही घाटगे यानी सांगितले. मडगाव परिसरात कॉंक्रीट टाकून खांब उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावरून काही विशेष गाड्या व मालवाहू गाड्या गवळता इतर प्रवासी सेवा बंद आहे.

Konkan Railway
Goa Election: भाजपचा फडणवीसांवर भरोसा

त्यामुळे वीज खांब उभारण्याचे काम शक्य झाले आहे. महाराष्ट्रातील रोहा ते वेर्णा व वेर्णा ते ठोकूर अशा दोन टप्प्यात विद्युतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. जानेवारी 2020 मध्ये ठोकूर ते उडपी दरम्यानचे विद्युतीकरण पूर्ण झालेल्या 110 कि.मी. मार्गावरील चाचणी यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.

Konkan Railway
Goa: वेस्टर्न बायपास रस्ता बांधकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल

दरम्यान दक्षिण मध्य रेल्वेच्या मडगाव ते सावर्डे दरम्यानच्या 15 किलोमीटर दुपदरी मार्गाची 23 सप्टेंबर रोजी चाचणी घेतली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा मंडळ आयुक्तांच्या देखरेखीखाली ही चाचणी घेतली जाणार असून 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने या मार्गावरून रेल्वे इंजिन चालवीत नेले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मडगाव - सावर्डे दुपदरीकरण पूर्ण झाले असले तरी मडगाव वास्को दरम्यानचे काम अजून अपूर्ण असून कासावली येथे या मार्गाला अजून विरोध चालूच आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com