कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांनी सज्ज रहावे: मुख्यमंत्री ठाकरे
Chief Minister Uddhav ThackerayDainik Gomantak

कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांनी सज्ज रहावे: मुख्यमंत्री ठाकरे

कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. वैद्यकीय यंत्रणांनी आपलं ऑडिट केले पाहिजे.

आपल्या सर्वांच्या परिश्रमामुळे कोरोनाची (Covid 19) स्थिती हाताळता आलेली आहे. राज्यातील टास्क फोर्सशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) डॉक्टरांशी संवाद साधत आहेत. देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असेल तर आपण त्यासाठी तयार असले पाहिजे. त्याचबरोबर आपण कोरोनाशी लढण्यासाठी सक्षम राहिले पाहिजे. तसेच वैद्यकीय यंत्रणांनी आपलं ऑडिट केले पाहिजे.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाड दौऱ्यावर, तळियेला देणार भेट

आज शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाच्या योगायोगाच्या दिवशी शिक्षक कुठे भेटेल हे सांगता येत नाही. कोरोनाचं संकट भेदून आपल्याला पुढे जायचं आहे. देशात काय चालू आहे, इतर राज्यांमध्ये काय चालू आहे हे पाहून आपण पाऊले टाकली पाहिजेत. सध्या कोरोना महामारीचा काळ सुरु आहे. कोरोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता आहे. सव्वा लाखाच्या आसपास ऑक्सिजन बेड आपण राज्यांमध्ये वाढवले आहेत. मात्र आपल्याला पुरेल असा ऑक्सिजन आहे का हे पण पाहण आवश्यक आहे. 500 मेट्रीक ऑक्सिजन आपल्या इतर राज्यांमधून आणावा लागत असे.

Chief Minister Uddhav Thackeray
रुटीन चेक-अपनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा घरी परतले

ऑक्सिजन आणेपर्यंत आपली आरोग्य व्यवस्था त्यावेळी श्वास रोखून धरत होती. 1400 मेट्रीक ऑक्सिजनचं उत्पादन आहे. राज्यात 12 लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. विरोधक म्हणत आहेत की, मंदिरासंह पुन्हा एकदा सर्व गोष्टी खुल्या करण्याची मागणी करत आहेत, मात्र परदेशात सध्या कोरोनाची काय परिस्थिती आहे याचादेखील आपण अंदाज घेत आहोत. एकदा सर्व खुले केले तर ते पुन्हा आपल्याला बंद करायचे नाहीये त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊनच आम्ही हळूहळू सर्व गोष्टी खुल्या करत आहोत, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com