Sachin Vaze Case : मिठी नदीच्या पाण्यातून वाझे प्रकरणाचे पुरावे आले वर 

दैनिक गोमंतक
रविवार, 28 मार्च 2021

पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझेंनी या वस्तू मिठी नदीत फेकल्याचे सांगितले जात आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याना अटक करून त्यांची चौकशी सुरु आहे. याच तपासात आता सचिन वाझे यांचे अनेक रहस्य मिठी नदीच्या पाण्यातून बाहेर येताना दिसत आहेत. एनआयएने पाणबुड्यांच्या मदतीने रविवारी मिठी नदीतुन वाहनाच्या दोन नंबर प्लेट्, संगणक सीपीयू, हार्ड डिस्क व डीव्हीआर जप्त केले आहेत. पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझेंनी या वस्तू नदीत फेकल्याचे सांगितले जात आहे. (Evidence of the Vaze case came from the Mithi river)

एनआयएला मिठी नदी मध्ये सापडलेली नंबर प्लेट ही अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ आणि या प्रकरणात वापरलेल्या इनोव्हा कारची असल्याचे समजते आहे. कारण ही  घटना घडण्यापूर्वी दोन्ही वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्यात आल्या असल्याची माहिती यापूर्वी झालेल्या तपासातून समोर आले होते. तपास यंत्रणांनी जप्त केलेले डीव्हीआर हे 17 ते 24 फेब्रुवावरी दरम्यान स्कॉर्पिओ गाडी पार्क केलेल्या सोसायटीमधील असून तो नष्ट करण्यासाठी सचिन वाझेंनी मिठी नदीत फेकल्याचे समजते आहे. तसेच याठिकाणी वाहनांच्या वेगवेगळ्या नंबरप्लेट सुद्धा सापडल्या आहेत. 

दरम्यान, 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ कार सापडली होती, ज्यामध्ये जिलेटीन सापडले होते.  काही दिवसानंतर त्याच  स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह सापडला होता.त्यानंतर 9 मार्च रोजी या गंभीर प्रकरणाची चौकशी एनआयएकडे सोपविण्यात आली होती.  एनआयएने या प्रकरणाचे सर्वात पहिले तपास अधिकारी म्हणून नेमलेल्या सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केलेली असून सचिन वाझे यांची चौकशी सुरु आहे. 

महाराष्ट्राचं चारित्र्यहनन तुमच्यासारख्या नाकर्त्या राज्यकर्त्यांनीच केलं;...

संबंधित बातम्या