"फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते" राऊतांचा धक्कादायक गौफ्यस्फोट 

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 11 जानेवारी 2021

भाजपचे आमदार नितेश राणें यांनी एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते असं धक्कादायक विधान शिवसेना खासदार विनाायक राऊत यांनी केलं.

कणकवली:भाजपचे आमदार नितेश राणें यांनी एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते असं धक्कादायक विधान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलं. शिवसेना भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायला मिळतात हे आता महाराष्ट्राला ज्ञात झालं आहे.राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली.कणकवलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले,"भाजप आमदार नितेश राणे यांनी मुबंईतील एका व्यक्तीला चक्क 12 कोटींचा गंडा घातला होता.

या प्रकरणाची चौकशी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी य प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती.या प्रकरणात नितेश राणेंना जेलमध्ये टाकण्याची तयारी ही झाली होती. मात्र नारायण राणे लगेच भाजपला शरण गेल्यामुळे ही करवाई थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले".तसेच ती केस उघडण्यात आली असती तर आज नितेश राणे आपणाला जेलमध्ये पहायाला मिळाले असते.

'नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी शेवटपर्यंत मंजूरी दिली नाही म्हणून राणे दिवसातूंन दोन-दोन वेळा फोन करत असत.अखेर आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्याच्या कारणामुळे त्याला मंजूरी देण्यात आली असंही राऊत म्हणाले.'ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता त्यांना न कळू द्या पण टिका करताना शान राखून टिका करण्याचा राजकीय सल्लाही राऊतांनी यावेळी नारायण राणेंना दिला'.

संबंधित बातम्या