प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या करणार शिवसेनेत प्रवेश

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या करणार शिवसेनेत प्रवेश
Famous Bollywood actress Urmila Matondkar to enter political party in Maharashtra Shiv Sena tomorrow

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. उर्मिला यांचं नाव शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीत देण्यात आलं आहे.


2019 ची लोकसभा निवडणुक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती, त्यावेळी भाजपच्या गोपाळ शेट्टींनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतल्याचा आरोप करत उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या उर्मिला मातोंडकर या बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब आहेत. त्यांनी अलिकडेच आजोबा नावाच्या मराठी चित्रपटामध्ये काम केलं होतं. आता त्या पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com