‘रत्नसागर बिच रिसॉर्ट’ ला ठोकले सील!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

प्रसिद्ध ‘रत्नसागर बिच रिसॉर्ट’ ला आज जिल्हा प्रशासनाने सील ठोकले आहे.  हे रिसॉर्ट रत्नागिरी शहराजवळ भाट्ये समुद्र किनाऱ्यावर आहे. सप्टेंबरमध्ये महिन्यात या रिसॉर्टचा शासकीय करार संपल्याने याला सील ठोकले आहे.

रत्नागिरी : प्रसिद्ध ‘रत्नसागर बिच रिसॉर्ट’ ला आज जिल्हा प्रशासनाने सील ठोकले आहे.  हे रिसॉर्ट रत्नागिरी शहराजवळ भाट्ये समुद्र किनाऱ्यावर आहे. सप्टेंबरमध्ये महिन्यात या रिसॉर्टचा शासकीय करार संपल्याने याला सील ठोकले आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून निचार केला तर या रिसॉर्टला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देता येईल का? याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

रत्नागिरी शहराजवळ भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर हे आलिशान रत्नसागर बीच रिसॉर्ट उभारण्यात आले आहे. तेव्हाचे पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाट्येची ही शासकीय जागा करारावर घेऊन हे आलिशान रिसॉर्ट बांधले होते. या रिसॉर्टमध्ये छोट्या-छोट्या एसी, नॉन एसी रुम बांधल्या आहेत त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना हे रिसॉर्ट चांगलेच पसंतीस  आणि सोयीचे पडले आहे. पर्यटन वाढीला या रिसॉर्टला चांगला फायदा झाला आहे. स्थानिक ऑनलाईन बुकिंमुळे बाहेरचे पर्यटक येथे अधिक प्रमाणात येतात. 

रिसोर्टमध्ये प्रशस्त जागा असल्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांचे येथे अनेक महत्वाचे कार्यक्रम होत असतात. सुरवातीला या रिसॉर्टमुळे स्थानिक पातळीवर काहीसा विरोध करण्यात आला  होता. परंतु काही काळानंतर तो लगेच मावळला. याबाबत माहिती सांगतांना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, ”रिसॉर्ट मालकाचा जिल्हा प्रशासनाच्या या जागेशी झालेला करार संपला आला आहे. त्यामुळे रत्नसागर बीच रिसॉर्टला आम्ही सील ठोकले आहे. मोठी जागा आणि तयार स्ट्रक्चर आहे. पर्यटनवाढीला त्याचा फायदा व्हावा, या अनुषंगाने ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देण्याचा विचार आहे.”

व्हँलेटाईन विक सेलिब्रेट करताय तर आताच व्हा सावधान! -

 

संबंधित बातम्या