Unique Wedding: अनोख्या लग्नाची अनोखी पंगत, पाहुण्यांसोबत जेवल्या गायी, कुत्री, मुंग्या!

Maharashtra Marriage: बुलढाणा जिल्ह्यातील कोथळी या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नात पक्षी आणि मुंग्यांना पाहुणे म्हणून बोलावले.
Animals
AnimalsDainik Gomantak

Maharashtra Marriage: महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचे लग्न अगदी अनोख्या पद्धतीने लावले. आत्तापर्यंत तुम्ही लग्नसोहळ्यात पाहुणे म्हणून लोकांना बोलवताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी प्राणी, पक्षी लग्नात सहभागी होताना पाहिलं आहे का?

बुलढाणा जिल्ह्यातील कोथळी या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नात पक्षी आणि मुंग्यांना पाहुणे म्हणून बोलावले.

वृत्तानुसार, या प्राण्यांना विवाहसोहळ्यासाठी आमंत्रित केले गेले आणि इतर पाहुण्यांसोबत खायला देखील दिले गेले. याशिवाय, लग्नातील एक अनोखी गोष्ट म्हणजे मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नाला (Marriage) आजूबाजूच्या पाच गावांतील लोकांना आमंत्रित केले होते, ज्यामुळे लग्नसोहळा भव्य झाला.

Animals
Bombay High Court: आठ दशकानंतर वृद्ध महिलेला मिळाला न्याय, वयाच्या 93 व्या वर्षी उघडले घराचे दरवाजे!

दुसरीकडे, शेतकरी (Farmer) प्रकाश सरोदे यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न अशा अनोख्या पद्धतीने केले. गावाजवळील पाच एकर शेतात मंडप उभारण्यात आला यावरुन लग्नाची भव्यता समजू शकते. लग्नात सुमारे दहा हजार लोकांना बोलावून जेवण दिले.

कोणत्याही लग्नात साधारणपणे 500 किंवा 1000 पाहुण्यांनाच आमंत्रित केले जाते, मात्र एकुलत्या एका मुलीच्या लग्नामुळे 10,000 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Animals
Delhi High Court: किशोरवयीन प्रेम नियंत्रणाबाहेर, निर्णय देताना न्यायालयाने काळजी घ्यावी!

तसेच, जनावरांसाठी मेजवानीच्या वेळी गायींसाठी दहा क्विंटल चारा, मुंग्यांसाठी दोन पोती साखरेची व्यवस्था करण्यात आली होती.

याशिवाय, गावातील कुत्र्यांसाठी खाद्यपदार्थही ठेवण्यात आले होते. कदाचित याच कारणामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये हे लग्न चर्चेचा विषय ठरले. लग्नाबद्दल लोक खूप चर्चा करतायेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com