शेतकऱ्यांचे मुबंईतील आंदोलन केवळ पब्लिसिटी स्टंट; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

शेतकऱ्यांचे मुंबईतील आंदोलन म्हणजे केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

 मुबंई : शेतकरी आणि कामगार कायद्याला विरोध करण्यासाठी राज्यातील शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावरती दाखल झाला. मात्र शेतकऱ्यांचे मुंबईतील आंदोलन म्हणजे केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. किसान सभेला मुंबईत आंदोलन करण्याची काही एक गरज नव्हती असंही आठवले यांनी म्हटले आहे. मात्र आठवलेंच्या या वक्तव्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मागणी केली आहे.

मुंबईतील शेतऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात माध्यामांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आठवले यांनी ‘’हे शेतकऱ्यांचे आंदोलन केवळ लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न शेतऱ्यांकडून करण्यात येत आहे.'' केंद्रसरकारने कायदा केला असून मागे घेण्याचा कोणताच प्रश्न उरत नाही. शेतकरी संघटनांनी आता आंदोलन थांबवल पाहिजे. आठवलेंच्या या विधानावरुन राज्यात राजकारण सुरु झाले आहे.

केंद्रसरकारने बनवलेल्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. केंद्रसरकारने कृषी कायद्यांना दीड वर्षासाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अशी आठवण यावेळी आठवलेंनी यावेळी करुन दिली. शेतकऱ्यांचे आंदोलन केवळ नि केवळ लोकप्रियता मिळवण्याचे साधन झाले असल्याचे मोदीसरकारला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचे नाव न घेता हल्लाबोल केला. केंद्रसरकार शेतऱ्यांना न्याय मिळवून सतत प्रयत्नशील असते. असेही आठवले यावेळी म्हणाले.

गेल्या दोन महिन्य़ांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. केंद्रसरकारने कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर ठाम आहेत. मात्र या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न केला जातो आहे.     

    

 

संबंधित बातम्या