रायगडमध्ये शेतीला पोषक पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी

Farmers are satisfied with the conducive environment for agriculture in Raigad
Farmers are satisfied with the conducive environment for agriculture in Raigad

रायगड -  महाराष्ट्रमधील रायगड जिल्ह्यात (Raigad district) पावसाच्या (Rain)सरी अधून मधून पडत आहेत. महाड पोलादपूर , श्रीवर्धन म्हसळा ते अगदी रोहा अलिबाग पेण तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी (River), नाल्याच्या  पाणी पातळीत वाढ झाली आहे. अद्याप कोणताही धोका नाही कारण पाण्याची पातळी प्रमाणात  वाढली आहे. (Farmers are satisfied with the conducive environment for agriculture in Raigad)

परंतु, डोलवहाळ बंधाऱ्याने पाण्याची पातळी ओलांडली आहे. हा पाऊस शेतीसाठी पूरक असल्याने पिकांची चांगलीच वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी समाधानी झाले आहेत. 

मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधील रोहा तालुका येथील रोहा केळघर मार्गे मुरुड रोड कवालठे येथे दरड कोसळली आहे. यामध्ये कोठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु सकाळपासून या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी बांधकाम खात्याचे कर्मचारी दरड हटवण्याचे काम करत आहेत. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक चार ते पाच नंतर सुरू करण्यात येणार आहे. 

तसेच कणकवलीतील गड नदीचा पात्र भरभरून वाहत आहे. किर्लोसवरुण दुसरीकडे जाणाऱ्या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे बंधारवरील वाहतूक ठप्प असून सात गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील नागरिकांचे देखील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीलागत राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

दरम्यान यंदा महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज असला तरी महाराष्ट्र मॉन्सून दाखल झाल्यापसून मरावाडा, मध्य महाराष्ट्रात अद्याप पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. सोयाबीन, तूर, भुईमूग आणि मका या पिकांच्या नियोजन करावे. भात पिकासाची तयारी सुरु ठेवावी,
खराप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीचा प्रकारपाहून कामे करावी. शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणीची कामे करु नये. पावसात खंड पडल्यास पेरणी वाया देखील जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. कमी पाण्यावर येणारी पीके शेतकऱ्यांनी शक्यतो घ्यावीत. पावसाची परिस्थिची लक्षात घेऊन पीक पध्दतीचा अवलंब करावा. कोकणात भात रोपे दोन टप्प्यात घ्यावीत, पावसाचे प्रमाण पाहून भाताची लागवण करणे यामुळे सोपे होईल.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com