मॉन्सूनचा अंदाजपाहूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी : कृषी विभागाचा सल्ला

मॉन्सूनचा अंदाजपाहूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी : कृषी विभागाचा सल्ला
Farmers work in farm.jpg

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने (Monsoon) गोव्यासह (Goa) कोकणात (Kokan) जोरदार हजेरी लावत संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापला असला तरी महाराष्ट्रातील काही भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगाऊ लागले आहे. हे संकट टळण्यासाठी जोपर्यंत ८० ते १०० मिलीमिटर पाऊस होत नाही तोवर पेरणी न करण्याचे शेतकऱ्यांना (Farmers) कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Farmers should estimate monsoon and sow seeds, says agricultural department)

यंदा महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज असला तरी महाराष्ट्र मॉन्सून दाखल झाल्यापसून मरावाडा, मध्य महाराष्ट्रात अद्याप पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. सोयाबीन, तूर, भुईमूग आणि मका या पिकांच्या नियोजन करावे. भात पिकासाची तयारी सुरु ठेवावी, खराप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीचा प्रकारपाहून कामे करावी.

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणीची कामे करु नये. पावसात खंड पडल्यास पेरणी वाया देखील जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये.

१५ जुलैपर्यंत कमी पाण्यावर येणारी पीके शेतकऱ्यांनी शक्यतो घ्यावीत. पावसाची परिस्थिची लक्षात घेऊन पीक पध्दतीचा अवलंब करावा. कोकणात भात रोपे दोन टप्प्यात घ्यावीत, पावसाचे प्रमाण पाहून भाताची लागवण करणे यामुळे सोपे होईल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com