देशभरात १ जानेवारी, तर महाराष्ट्रात २६ जानेवारीपासून 'फास्ट टॅग' अनिवार्य

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी १ जानेवारीपासून देशभरातील सगळ्या टोलनाक्यांवर टोल वसुलीसाठी 'फास्ट टॅग' इलेक्ट्रॉनिक पद्धत बंधकारक असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबई :  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी १ जानेवारीपासून देशभरातील सगळ्या टोलनाक्यांवर टोल वसुलीसाठी 'फास्ट टॅग' इलेक्ट्रॉनिक पद्धत बंधकारक असल्याचे जाहीर केले आहे. फास्ट टॅग नसल्यास दंड आकारण्यात येणार आहे. देशभरात ही पद्धती १ जानेवारीपासून सुरू होणार असली, तरी महाराष्ट्रात मात्र याची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

याची सुरूवात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल मार्ग आणि मुंबई एन्ट्री पॉईंट आणि वरळी सा लिंक या महत्त्वाच्या टोलनाक्यांपासून होऊन, मग उर्वरित महाराष्ट्रातील टोलनाक्यावर अंमलबजावणी होणार आहे. टोलनाक्यांवरील गर्दी आणि गोंधळ कमी करण्यासाठी वर्षभरापूर्वी फास्ट टॅगचा निर्णय घेण्यात आला होता. फास्ट टॅग हे एका स्टिकर सारखे असून, ते गाडीच्या समोराल काचेवर लावतात. सध्या फास्ट टॅग असणाऱ्या गाड्यांसाठी टोलनाक्यांवर स्वतंत्र रस्त्यांची सोय आहे. या अंमलबजावणामुळे महामार्गांवरील गर्दी कमा होण्यास मदत होणार आहे.

संबंधित बातम्या