'संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! '

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 डिसेंबर 2020

वर्तमानपत्रीय लेखातून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल बोरुबहाद्दर संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

मुंबई :  वर्तमानपत्रीय लेखातून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल बोरुबहाद्दर संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसबरोबर सध्या राऊत गेले असल्याने त्यांना असे विचार सुचत आहेत, असे सांगून भातखळकर यांनी काँग्रेसवरही कोरडे ओढले आहेत.

संजय राऊत यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिले असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी समाजमाध्यमांवर चित्रफीत प्रसारित करून राऊत यांचा समाचार घेतला. त्यात त्यांनी राऊत यांचा उल्लेख बोरुबहाद्दर असाही केला आहे.

संबंधित बातम्या