धक्कादायक: हळदी समारंभात आलेल्या आदिवासी महिलेला ठरवले चेटकीण

महिलेला जबरदस्तीने मानेला धरत मंडपाच्या मध्यभागी बसविले
Superstition
SuperstitionDainik Gomantak

महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका हळदीच्या कार्यक्रमात आलेल्या आदिवासी महिलेला चेटकीण ठरवले आहे. तसेच तीला इतर महिलांमधून मंडपाच्या मध्यभागी आणत तीच्या अंगावर भंडारा टाकण्यात आला. तसेच दोन तरुणांनी महिलेला चेटकीण ठरवत तिच्यावर भुताटकीचा आरोप केला. (Filed an offense under Witchcraft Prevention Act at Palghar)

या महिलेला मंडपात पुढे - पुढे ढकल तिच्या डोक्यावर ही भंडारा टाकला. व यानंतर प्रसिद्घ झालेल्या व्हिडीओनुसार तिच्यापासून सर्वांनी सावध रहा. हीच्यापासून धोका आहे. असे म्हणत तिला सर्व उपस्थितांच्या समोरुन बाहेर काढण्यात आले.

Superstition
खेलो इंडिया गेम्स 2022 मध्ये महाराष्ट्र अव्वल

याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार वाडा पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना वाडा तालुक्यातील बेरशेती गावात घडली आहे. विवाहानिमित्तानं 25 मेच्या रात्री हळदीसमारंभ आयोजित करण्यात आला होता.

Superstition
पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; मार्गावरील दारुची दुकाने राहणार बंद

यावेळी पारंपरिक पध्दतीने कुळदैवतांची पूजा करताना दोघा पुरुषांनी अंगात वारा आल्याचे सांगत त्यांनी घरातील सर्व उपस्थितांना मांडवात जायला सांगितले. त्यानंतर भंडारा उधळत सागरने एका आदिवासी महिलेच्या हाती पहार देत मंडपाच्या मध्यभागी असलेल्या खांबाजवळ खोदायला सांगितले.

त्या महिलेने नकार दिल्यावर जबरदस्तीने तिच्या मानेला धरत या खांबाजवळ बसविले. मग एकाने त्या खोदलेल्या जागेतून देवीची लहान मूर्ती काढली. या महिलेपासून सावध रहा, असे ओरडून सांगू लागला. त्या महिलेची ओवाळणी करत तिच्या अंगावर भंडारा उधळला आणि नारळ देखील फोडला.

त्यानंतर ह्या महिलेबद्दल जातीवाचक बोलत ती भुताटकी करतेय, असा आरोप दोघांनी केला. त्यामुळे येथील नागरिकांसमोर महिलेची मानहानी झाल्याची घटना घडली आहे. महिने याबाबत तक्रार पोलिसात दाखल केली असून पोलिसांनी याबाबत अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com