अखेर संजय राठोडांनी मौन सोडलं; पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पहिली प्रतिक्रिया

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माझ्या बदनामीचा प्रयत्न राज्यातील विरोधकांकडून केला जात आहे.

यवतमाळ: बीडमधील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकिय वातावरण तापलं असताना महाविकास आघाडीमधील वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी आज 15 दिवसानंतर पुढे येत पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहचले. पूजा आत्महत्य़ा प्रकरणामुळे वनमंत्री राठोड गायब होते. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचे नाव सर्वांसमोर आले होते. त्यानंतर भाजपकडून वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

तर दुसरीकडे पोहरादेवीच्या दर्शनासाठी वनमंत्री संजय राठोड पोहचल्यांनतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला ‘’पूजा चव्हाण प्रकरणात माझ्या बदनामीचा प्रयत्न राज्यातील विरोधकांकडून केला जात आहे. पूजाच्या मृत्यूमुळे संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. चव्हाण कुटुंबाच्या दु:खामध्ये मी आणि संपूर्ण बंजारा समाज सहभागी आहे. मात्र या घटनेवरुन संपूर्णं महाराष्ट्रात ज्या पध्दतीचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे ते निराधार आहे. बंधूनो मी मागासवर्गीय कुटुंबातून येतो. भटक्या विमुक्त जातीचं प्रतिनिधीत्व करणारा एक मी कार्यकर्ता आहे.’’

संजय राठोड पोहरादेवीला पोहोचले; काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष

ते पुढेही म्हणाले, ‘’गेल्या 30 वर्षांपासूनच्या माझ्या सामाजिक, राजकिय आणि वैयक्तिक जीवनाला उध्दवस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आत्महत्य़ा प्रकरणाचं समाजमाध्यमातून जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला गेला त्यामध्य़े कोणत्य़ाही प्रकारचं तथ्य नाही. मी खात्रीने सांगू शकतो की, या प्रकरणाची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी लावली आहे. पोलिस तपास करत आहेत आणि यातून सगळ काही स्पष्ट होणार आहे. गेल्या 6 दिवसांपासून माझी आणि समाजाची समाजमाध्यामातून बदनामी करत घाणेरडं राजकारण केलं जात आहे. माझी आणि समाजाची कृपया बदनामी करु नका. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. यातून सर्व काही स्पष्ट होईल.'' 

महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे गोव्यात रेती वाहतूक करणारे ट्रक ताब्यात

''दरम्यान माझं शासकिय काम मुंबईतील प्लॅट वरुन चालू होतं. कोठेही मी थांबलो नव्हतो. आज या पोहरादेवीच्या पवित्र भूमीमध्ये येऊन दर्शन घेऊन पुन्हा नव्याने काम चालू करणार आहे. जे काही सत्य आहे ते चौकशीमधून बाहेर येणार आहे. आता मला या बाबतीत काहीही बोलायचे नाही. माझ्यावर मागासवर्गीय समाजाचं प्रेम आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी सामाजीक आणि राजकिय क्षेत्रात आहे. एका घटनेमुळे मला वाईट समजू नका’’,असंही यावेळी संजय राठोड म्हणाले.    
 

संबंधित बातम्या