मुंबईत अग्नितांडव सुरूच; वर्सोव्यातील एलपीजी सिलिंडर गोडाऊनमध्ये भीषण आग

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

आग्निशमन दलच्या 8 गाड्या आणि 7 जंबोच्या पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई : आज सकाळी मुंबईच्या वर्सोव्यातील यारी रोड येथील एलपीजी सिलिंडर गोडाऊनमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. ही घटना आज सकाळी 10 च्या दरम्यान वर्सोव्यातील यारी रोड, आराम नगरजवळ घडली आहे. आग्निशमन दलच्या 8 गाड्या आणि 7 जंबोच्या पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आता मुंबई-कोकण प्रवास करा विमानाने; चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली

आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशामक दलाचा एक जवानदेखील आग विझवताना जखमी झाला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सविस्तर माहिती येत आहे..

नवनीत राणा यांनी सचिन, लता मंगेशकर आणि कोहली यांचे समर्थन करत विरोधकांना दिले...

गेल्या 24 तासांत शहरात आगी लागण्याच्या किमान तीन घटना घडल्या. प्रथम, तळोजा औद्योगिक क्षेत्रातील चार कारखान्यांना भीषण आग लागली, त्यानंतर शिवसेना कार्यालयाशेजारील वर्सोवा फिश मार्केटजवळ आणखी एक आग लागली आणि तिसरी घटना ठाणे वागळे इस्टेटमधील मोडला कंपाऊंडच्या खोल्यांमध्ये घडली होती.

संबंधित बातम्या