मच्छीमारालाच ओढले काळाने मृत्यूच्या जाळ्यात

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मालवण येथे मध्यरात्री घडली आहे.

मालवण: मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मालवण येथे मध्यरात्री घडली आहे. मासेमारी करतांना जाळे ओढत असताना होडीतून तोल गेल्याने शंकर सखाराम फोंडबा (वय ५७, रा. सर्जेकोट) यांचा समुद्रात पडून मृत्यू झाला.  या याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेबद्दल ची माहीती नितीन परुळेकर यांनी पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार , सर्जेकोट येथील माऊली कृपा कवडा रॉक नजीकच्या समुद्रात त्यांच्या पातीवरून मासेमारीच्या  मासेमारीसाठी गेले होते. मध्यरात्री दोन वाजता च्या सुमारास मासेमारीचे जाळे ओढतांना शंकर फोंडबा यांचा  तोल गेल्याने ते समुद्रात पडले. आणि त्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. 

याघटनेची माहिती नितीन परुळेकर यांनी पोलिस ठाण्यात दिली असून आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेसंबधिचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर करत आहेत.

आणखी वाचा:

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मृत कावळे आढळल्याने रत्नागिरीत भीतीचे वातावरण -

संबंधित बातम्या