यावर्षी मासळीच्या दरात ५० टक्‍क्‍यांची घट,मच्छीमारांवर संक्रांत..

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

बंपर काळात  दररोज दोन कोटींची उलाढाल होणाऱ्या येथील बंदरात ठप्प झाल्यात जमा आहे, त्यामुळे मच्छिमार दुर्देवाच्या फेऱ्यात अडकला आहे. . सुमारे ८०० नौका दर्याऐवजी बंदरावरच पडून आहेत.

हर्णै (रत्नागिरी) : बंपर काळात  दररोज दोन कोटींची उलाढाल होणाऱ्या येथील बंदरात ठप्प झाल्यात जमा आहे, त्यामुळे मच्छिमार दुर्देवाच्या फेऱ्यात अडकला आहे. . सुमारे ८०० नौका दर्याऐवजी बंदरावरच पडून आहेत.

नोव्हेंबर २०२० मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तेव्हापासून मासळीची आवकच कमी झाली आणि आता तर मासेमारीला जाऊन मासळी मिळतच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे  २०० नौका हर्णै बंदरात उभ्या आहेत. उर्वरित ५०० ते ६०० नौका आंजर्ले खाडीत जाऊन थांबल्या आहेत. ८ ते १० दिवसांपूर्वी उत्तरेकडील जोरदार वारे चालूच होते. वातावरणात अचानक होणारे बदल, केरळ, कर्नाटक आणि गुजरातच्या फास्टर इंजिन असलेल्या नौकांचे अतिक्रमण यामुळे पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळणं कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे बंदरामध्ये सकाळ-संध्याकाळी चालणारा लिलाव थंडावला आहे.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसापासून ते आताच्या खराब हवामानापर्यंत मच्छीमार निसर्गाचा कोपच अनुभवत आहेत. यामुळे या आधी कधी नव्हे एवढा मच्छीमार हतबल झाला असून या व्यवसायावर अवलंबून सुमारे दोन हजार कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे. सरकारने मासळी दुष्कार जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. गेले २० ते २५ दिवस हर्णै बंदरामध्ये मासेमारीच बंद झाली आहे. किमान १५० ते २०० नौका हर्णै बंदरात उभ्या आहेत आणि उर्वरित ५०० ते ६०० नौका आंजर्ले खाडीत जाऊन थांबल्या आहेत.

याबाबत स्थानिक मच्छीमारांनी सांगितले की, २० ते २५ दिवसांपूर्वी सहा सिलेंडरच्या नौका डिझेल भरून मासेमारीला जात होत्या तेव्हा काहीच मासळी मिळत नव्हती. रोजचा होणारा सर्व खर्च हा नौकामालकाच्या अंगावर पडू लागला. समुद्रात मासेमारीला जायचं आणि नुसतं डिझेल संपवून यायचं अस चाललं होतं. ही अवस्था सहा सिलेंडर ट्रॉलर नौकांची आहे परंतु दोन सिलेंडरच्या नौकांचीदेखील तशीच अवस्था आहे.

 

संबंधित बातम्या