
5 Members of a Family Drowned: एकीकडे देश विविध पातळ्यांवर प्रगतीची नवनवी शिखरे सर करत असताना देशातील अजूनही अनेक गावांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून अनेक दुर्घटना समोर येत असतात. अशीच एक घटना कल्याण जिल्ह्यातील डोंबिवलीत घडली आहे. येथे एकाच कुटूंबातील पाच जणांचा खणीत बुडून मृत्यू झाला आहे.
डोंबिवलीतील संदीप या गावात ही घटना घडली आहे. या गावात नेहमीच पाणी टंचाई असते. येथील एका खणीवर हे कुटूंबीय कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत सासू सुनेसह घरातील तीन मुलांचा समावेश आहे. डोंबवली पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू मीरा गायकवाड (55) आणि सून अपेक्षा (30) यांच्यासह त्यांच्या घरातील मयुरेश (15), निलेश (15), आणि मोक्क्षा (13) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण या खणीत कपडे धुण्यासाठी आले होते. खणीच्या काठावर बसून कपडे धुवत असताना मीरा गायकवाड यांचा एक नातू पाय घसरून खणीत पाण्यात पडला.
त्याला पोहायला येत नसल्याने तो बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी दोन्ही महिला पाण्यात उतरल्या. पण त्यांनादेखील पोहायला येत नव्हते. खोलीचा अंदाज न आल्याने त्यादेखील बुडू लागल्या. ते पाहून त्यांच्या घरातील उर्वरित दोघे त्यांना वाचविण्यासाठी खणीत उतरले. पण त्यांनाही पाण्याचा आणि खोलीचा अंदाज आला नाही.
एकामागोमाग असे सर्व पाचही जण पाण्यात उतरले. पण एकमेकांना वाचविण्याच्या नादात सर्वजण बुडाले. मानपाडा पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. आणि खणीत शोधमोहिम राबवली. यावेळी पाचही जणांचे मृतदेह आढळून आले.
संदीप हे गाव कल्याण शहराजवळ आहे. येथील गावकऱ्यांना महिनोनमहिने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे कपडे धुण्यासाठी महिला या खणीवर येत असतात. गेल्याच महिन्यात कल्याण येथील नांदीवली भागातील पाणी टंचाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला फटकारले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.