बेळगाव-नाशिकदरम्यान विमानसेवा सुरु, कोल्हापूर ते गोवा प्रवास होणार तीन तासात

दैनिक गोमन्तक
रविवार, 3 जानेवारी 2021

बेळगाव ते नाशिक दरम्यान २५ जानेवारीपासून विमानसेवा सुरु होणार आहे.​

बेळगाव : बेळगाव ते नाशिक दरम्यान २५ जानेवारीपासून विमानसेवा सुरु होणार आहे. ही विमानसेवा सुरु करण्यासाठी शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले आहेत. यामुळे बेळगावसह परिसरातील नागरिकांना शिर्डी साईबाबांचे दर्शन घेणे सोपे झाले आहे. या विमानसेवेच्या प्रारंभप्रसंगी खासदार गोडसे उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर आणि गोवा दिड ते दोन तासाच्या अंतरावर

नाशिक-बेळगाव विमानसेवेमुळे कोल्हापूर आणि गोव्याला आता दिड ते दोन तासात पोहचणे शक्या होणार आहे.उडान योजनेअंतर्गत नाशिक शहर देशभरातील मोठ्या शहरांना जोडले जावे  यासाठी खसदार गोडसे प्रयत्नशील आहे. नाशईक येथून कोल्हापूरच्या महालक्षमीला, आणि गोव्याला पर्यटनासाठी जाण्याऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नाशिक बेळगाव दरम्यानची विमानसेवा सुरू व्हावी याकरीता जिल्हातील अनेकांनी खोसदार गोडसे कडे मागणी केली होती.

संबंधित बातम्या