सिंधुदुर्ग किल्याच्या पाऊलखुणा; कसा मिळवला पेडणे महालावर पोर्तुगीजांनी ताबा 

FORT.jpg
FORT.jpg

पेशव्यांच्या (Peshwa) मदतीने कोल्हापूरांकडून (Kolhapur) किल्ले परत घेतल्यानंतर सावंतवाडीकरांशी (Sawantwadi) संबंधित राजकीय समीकरणे पुन्हा बदलली. पेशव्यांच्या मदतीने पोर्तुगिजांकडून (Portuguese) पेडणे महाल (Pedne Mahal)  परत घेण्यासाठी संघर्ष सुरु केला. यास ग्वाल्हेरच्या (Gwalior) शिंदेना सरकारचे मोठे पाठबळ होते. हा महाल परत मिळाल्यानंतर ग्वाल्हेरहून मिळणारी मदत जीवबादादा आणि महादजी शिंदे यांच्या निधनानंतर पुरतची घटली होती. पेडणे महालावर पोर्तुगिजांनी ताबा मिळवला. संस्थानाची सततच्या युध्दामुळे आर्थिक परिस्थिती खलावली होती.  (Footprints of Sindhudurg fort How the Pedne Palace was captured by the Portuguese)

सावंतवाडीकरांनी कोल्हापूरकरांकडील ठाणी परत मिळवल्यावर तहा दरम्यान गमावलेला पेडणे परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु तहामध्ये ठरल्याप्रमाणे कोल्हापूरांविरुध्द लढाईत पोर्तुगींजांची पूर्ण मदत झाली नाही. सावंतवाडीकरांनी त्यांनी गमावलेले किल्ले, ठाणी परत मिळवून देण्यासाठी पोर्तुगिजांचा कोणताही प्रकारचा उपयोग झाला नाही.

सावंतवाडीकरांनी पेडणे महाल परत मिळवण्यासाठी सैन्याची काही प्रमाणातील कुमक पेडणे येथे पाठवली. सीमांवरती चौक्या बसवून आपला अंमल सुरु केला होता. सावध होत पोर्तुगिजांनी आपले लोक जागोजागी ठेवले. त्यांच्या प्रभावाखालील कुटुंबांना बार्देशात (Bardesha) राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये सावंतवाडीकरांना पेशव्यांची मदत होती.

सावंतवाडीकरांच्या मदतीसाठी पेशव्यांचे सरदार परशुरामभाऊ पटवर्धन (Parashurambhau Patwardhan) यांना फौजा पाठवायचे ठरले होते. तर तिकडे पेडणे महाल पोर्तुगीजांनाही आपल्याकडे ठेवण्यात स्वारस्य नव्हते. कारण पेशव्यांचा सावंतवाडीकरांना पाठिंबा होता. त्यामुळे संघर्ष होणे अटळ होते. सावंतवाडीकरांनी पेडणे महाल आपला खर्च देवून कायमचा आपल्याकडे ठेवावा, असा पोर्तुगींजाचा प्रस्ताव होता. यासंदर्भात बोलणी करण्यासाठी पोर्तुगीजांनी आपला वकिल बहुगुण कामत (Bahuguna Kamat) याला थेट पेशव्यांकडे पाठवला होता. पर्याय काढण्यासाठी तेथे पेशव्यांचे दुसरे सरदार देवबा लाड (Devba Lad) यांनी वकील कामत यांच्याकडे कबुल केले होते. मात्र सावंतवाडीकरांचे हिंतचिंतक असलेल्या देवबा लाड यांना मात्र पटले नाही. त्यामुळे पेडणे महाल पोर्तुगींजाकडून ताकदीच्या जोरावर मिळवण्याबाबत पेशव्यांकडे शब्द टाकला. ही सगळी चर्चा सुरु असताना 12 फेब्रुवारी 1794 रोजी महादजी शिंदे यांचे निधन झाले. त्यामुळे पेशव्यांकडून मिळणाऱ्या मदतीची आशा मावळली. 

सावंतवाडीकरांनी इकडे स्वतंत्रपणे सैन्याची जमवाजमव सुरु केली होती.  सप्टेंबर 1794 मध्ये सोमसावंत आणि राम आकेरकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीकरांचे सैन्य पेडणेकड्या रवाना झाले. इकडे पोर्तुगीजांनीही त्यांच्याविरुध्द लढाईची चांगली तयारी केली होती. दोघांमध्ये चकमकी उडाल्या मात्र अखेर पोर्तुगीजांना यामध्ये माघार घ्यावी लागली. पेडणे महाल 1794 मध्ये सावंतवाडीकरांच्या ताब्यात आला. यांनतर पोर्तुगीजांचा सोम सावंत यांनी पराभव करण्यासाठी पुन्हा एकदा चढाई केली. तसेच याला शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी रेडी यशवंतरावर आरमार पाठवण्याची तयारी केली. याला प्रतिशह देण्याकरिता जीवबादादांचे भाऊ नरोबादादा यांच्याकडे सावंतवाडीकरांनी मदत मागितली. याच दरम्यान खर्ड्याच्या लढाईसाठी जीवबादादांना पुण्यात यायचे होते. त्यामुळे सावंतवाडीकरांना त्यांच्याकडून मदत होईल, अशी भीती पोर्तुगीजांना वाटली. त्यामुळे त्यांनी रेडीवर चाल करण्याचा बेत त्यांनी रद्द केला.  

तर तिकडे सावंतवाडीकरांनी आपली आगेकूच सुरुच ठेवली होती. पोर्तुगीज आणि सावंतवाडीकरांची फोंड्याच्या अलीकडेच लढाई होवून यात फोंडा महाल सावंतवाडीकरांना मिळाला. तिसरे खेम सावंत यांच्या कारकिर्दीत भरपूर लढाया झाल्या. यामध्ये राज्याच्या खजिन्याची स्थिती खूपच खालावली होती. फोंड्याजवळील लढाईमध्ये राज्याचा खजिना बराच रिकामा झाला होता. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी सावंतवाडीकरांनी अनेक मार्ग अवलंबवावे लागले. यामध्ये काही लोक बरीच दुखावली. सावंतवाडीकरांच्या दृष्टीने एक गोष्ट वाईट घडली. जीवबादादांचे 6 जानेवारी 1796 निधन झाले. यामुळे ग्वाल्हेमधू मिळणारे पाठबळ पूर्णत:हा कमी झाले. त्यानंतर साहजिकच सावंतवाडीकरांचे पांरपारिक शत्रू मानले जाणारे कोल्हापूर आणि पोर्तुगीजांनी परत एकदा उचल खाल्ली. सावंतवाडीवर स्वारी करत कोल्हापूरकरांनी अनेक भागामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सुरुवात केली. यावेळी  चंद्रो फर्जंद यांना सावंतवाडीकरांनी या सैन्याला शह देण्याची जबाबदारी सोपवली होती. 25 ऑक्टोबर 1798 मध्ये फर्जंद यांनी आवळेगाव येथे कोल्हापूरच्या सैन्याचा पराभव केला. या लढाईत  फर्जंद यांनी मोठा पराक्रम गाजवला होता. त्यामुळे त्यांना राजश्री हा मानाचा किताब देण्यात आला.

कोल्हापूरकरांचे संकट काहीसं टळताच 1800 मध्ये पोर्तुगीजांनी पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली. गर्व्हनर जनरल फ्रान्सीस्को अन्टोनिओ डाव्हेगा काब्राल याने कर्नल व्हिसेंट या आपल्या सेनापतीच्या बरोबर गोडीनो डिमीरा याच्याबरोबर मेजर डॉस्यांटास आणि 400 अशा निवडक सैनिकांना सावंतवाडीकरांकडून पेडणे महाल जिंकून घेण्यासाठी पाठवले. त्यांनी पाठवलेल्या सैन्यांसोबत तोफाही पाठवल्या होत्या. सावंतवाडीकरांनी पेडणे महालाच्या रक्षणासाठी सैन्याबरोबर पोर्तुगीजांची तिथल्या रवळनाथ मंदिराच्या जवळ मोठी लढाई झाली. या लढाईत सावंतवाडीकरांना माघार घ्यावी लागली. पोर्तुगीजांनी सावंतवाडीकरांच्या तीन नातलगांना पकडून आग्वादच्या किल्ल्यामध्ये कैद करुन ठेवण्यात आले. 

गाव मिळाले इमाम
सावंतवाडीकरांची बरीच मोठी कामे जीवबादादा आणि त्यांचे बंधू नरोबादादा यांचे जेष्ठ चिरंजीव नारायणराव यांनी केली होती. त्यामुले त्यांना काही जमीन, गावे ईनाम म्हणून द्यावी, असा राजश्रींनी घेतला. तळगाव तर्फ वराड हे गाव 2 एप्रिल 1794 रोजी इनाम म्हणून देण्यात आले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com