माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जावायांना सीबीआयने घेतले ताब्यात
Anil DeshmukhDainik Gomantak

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जावायांना सीबीआयने घेतले ताब्यात

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे जावाई गौरव चतुर्वेदी (Gaurav Chaturvedi) यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे जावाई गौरव चतुर्वेदी (Gaurav Chaturvedi) यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. अचानक सीबीआयकडून (CBI) झालेल्या कारवाईमुळे ही खळबळ उडाली आहे. परंतु देशमुख कुटुंबाकडून यांचे अपहरण केले असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी सहाच्या सुमारास सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी चतुर्वेदी आणि त्यांचे वकिल यांना ताब्यात घेतले. मात्र दुसरीकडे अपहरण झाले असल्याची तक्रार देशमुख कुटुंबिंयाकडून पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुख यांना CBIची क्लीन चिट मिळणार?

अनिल देशमुख यांच्या सुनेने आरोप केला आहे की, त्यांच्या वरळीमधील घराखाली 8 ते 10 लोक एका पांढऱ्या इनोव्हामधून घरी आले. साध्या वेशामध्ये असलेल्या या लोकांनी डॉ. गौरव चतुर्वेदी आणि त्यांच्या वकिलाच्या जवळील फोन जप्त करत त्यांना कारमधून घेऊन गेले. सध्या यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी वरळी पोलिस ठाण्यात आलो आहोत संध्याकाळच्या सुमारास ही घटना झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com