शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

वृत्तसंस्था
शनिवार, 19 डिसेंबर 2020

शिवसेनेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्याचे नेते मोहन रावले यांचं निधन झालं. त्यांनी ७२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्याचे नेते मोहन रावले यांचं निधन झालं. त्यांनी ७२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचॆ निधन हृदय विकाराच्या झटक्यानं झाल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबईत शिवसेनेला वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे ते शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय होते. काही कारणास्तव गोव्यात गेले असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला. मोहन रावले यांचं पार्थिव आज मुंबईतील आणलं जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते.

संबंधित बातम्या