कोरोना रुग्णालयात लागलेल्या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
शनिवार, 10 एप्रिल 2021

नागपुरच्या खासगी कोरोना रुग्णालयात लागलेल्या आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जखमी असल्याची माहिती मिळते आहे. तर या घटनेनंतर या रुग्णालयात असणाऱ्या 27 रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे समजते आहे. 

नागपुरच्या खासगी कोरोना रुग्णालयात लागलेल्या आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जखमी असल्याची माहिती मिळते आहे. तर या घटनेनंतर या रुग्णालयात असणाऱ्या 27 रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे समजते आहे. जखमी आणि गंभीर रूग्णांच्या स्थितीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Four patients died in a fire at a private Corona Hospital in Nagpur Maharashtra)

महाराष्ट्रात पूढील तीन  आठवड्यांसाठी लॉकडाऊन लागण्याची शक्यता  

नागपूर (Nagpur) शहराच्या वाडी भागात असणाऱ्या  खासगी कोरोना रुग्णालयाला काल रात्री 8:30 च्या सुमारास ही आग लागल्याचे समजते आहे. हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग आयसीयूच्या एसीयू युनिटमध्ये आग पसरली अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी (एनएमसी) यांनी दिलेल्या माहिती नुसार रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. आग लागली त्यावेळेला दुसर्‍या मजल्यावर 10 रुग्ण उपस्थित होते, त्यापैकी सहा स्वत: बाहेर आले आणि इतर चार जणांना अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी बाहेर काढले आणि शर्थीचे प्रयत्न करून रुग्णालय रिकामी करण्यात आले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

दरम्यान, एका महिन्यात हॉस्पिटलमध्ये आग (Fire) लागल्यामुळे महाराष्ट्रातील ही दुसरी घटना आहे. मागील महिन्यात मुंबईच्या (Mumbai)भांडुप उपनगरातील मॉलमध्ये सुरू असलेल्या खासगी रुग्णालयात अचानक लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. एकीकडे कोरोनाचे विषाणूने (Corona Virus)त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये अश्या घटनांमुळे भीतीचे वातावरण पसरताना दिसते आहे.  

 

संबंधित बातम्या