टीआरपी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने १४व्या आरोपीला ठोकल्या बेड्या

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

टीआरपी गैरव्यवहारात सहभाग असल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने १४ वा आरोपी रोमिल रामगरहिया यांना बेड्या ठोकल्या

अंधेरी: टीआरपी गैरव्यवहारात सहभाग असल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंत तब्बल १३ आरोपींना अटक केली आहे. गुरुवारी पथकाने १४ वा आरोपी रोमिल रामगरहिया यांना बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ‘रिपब्लिक टीव्ही’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विकास खानचंदानी यांना अटक केली होती. खानचंदानी यांची यापूर्वीच दोन वेळा चौकशी करण्यात आलेली होती. त्यानंतर आता रोमिल यांना अटक झाली असून गुन्हे शाखा पथक त्यांची चौकशी करीत आहे. टीआरपी गैरव्यवहारात केबल ऑपरेटरने एलसीएनचा वापर केल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेच्या रोमिल रामगरहिया हे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल म्हणजेच बीएआरसी प्रकरणात बार्क संस्थेशी संलग्न होते. अशा संस्थेतील पदाधिकाऱ्याला अटक करण्याची ही बहुधा देशातील पहिलीच घटना असावी. 

आणखी वाचा:

अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका -

 

संबंधित बातम्या