'व्हँलेटाईन विक' सेलिब्रेट करताय तर आताच व्हा सावधान!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

"मुंबईच्या ताज हॉटेलने व्हँलेटाईन आठवडा साजरा करण्यासाठी 200 गिफ्ट कार्ड्स वाटले आहेत. आपण हे कार्ड वापरु शकता आणि सात दिवस मोफत ताज हॉटेलमध्ये राहू शकता.

मुंबई :  फेब्रुवारी महिना हा प्रेमी लोकांचा महिना आहे असच म्हटलं जातं. कारण या महिन्यात तरूण तरूणींच्या प्रेमाला उधाणच येतं.  'व्हँलेटाईन विक' आणि  'व्हँलेटाईन डे ची धूमधाम सुरु होते. तरुणाईमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला दिसतो; जणू ते सर्व प्रेमी या प्रेम ऋतूचीच वाट बघत असतात. आपल्या मनात आपल्याला आवडत असलेल्या व्यक्तीला आपल्या भावना सांगणे त्याच्या किंवा तिच्याकडे या भावना व्यक्त करणे म्हणजे व्हँलेटाईन डे. प्रत्येकाची आपआपली गणितं लागलेली असतात.

पण हा व्हँलेटाईन डे फक्त तरूणांपर्यंत मर्यादित राहत नाही तर या व्हँलेटाईन डे भोवती व्यावसायिक गणितं देखिल जुळलेले असतात. या दिवसात सोशल मिडियावरून वेगवेगळ्या ऑफर्स आपल्याला येत आसतात वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला नव्या नव्या स्किम सांगत असतात तेव्हा याच आठवड्यात फसवणुकीचे प्रकार देखील सर्रास होताना दिसतात. व्हँलेटाईन डे संदर्भातील असाच एक व्हायरल मॅसेज सध्या व्हाट्सएपवर व्हायरल होत आहे. यामध्ये व्हँलेटाईन च्या आठवड्यात मुंबई मधील ताज हॉटेलमध्ये मोफत राहण्याची ऑफर देण्यात आली आहे. या मॅसेजमध्ये एक कूपन किंवा एक गिफ्ट कार्ड आपल्याला बघायला मिळेल त्या मॅसेजद्वारे आपल्याला एक आठवडा ताज हॉटेलमध्ये राहता येणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा दावा कितपत खरा आहे याचे स्पष्टीकरण खुद्द  ताज हॉटेलनेच दिले आहे.

रत्नागिरीच्या कलाकाराचा सर्वात लहान रांगोळी साकारत अनोखा विश्वविक्रम -

या मॅसेजमध्ये असे सांगण्यात आले हे की,  "मला ताज हॉटेलकडून एक गिफ्ट कार्ड मिळाले आहे. आणि मला व्हँलेटाईन आठवड्यात सात दिवस ताज हॉटेलमध्ये मोफत राहण्याची संधी प्राप्त झाली आहे." या मॅसेजमध्ये असे लिहले आहे की, "मुंबईच्या ताज हॉटेलने व्हँलेटाईन आठवडा साजरा करण्यासाठी 200 गिफ्ट कार्ड्स वाटले आहेत. आपण हे कार्ड वापरु शकता आणि सात दिवस मोफत ताज हॉटेलमध्ये राहू शकता. आपल्याला यातील योग्य गिफ्ट बॉक्स ओपन करायचा आहे. आपल्याकडे तीन संधी आहेत. गुड लक!"

डीसी डिझाईनचा संस्थापक डिझायनर छाब्रियाला आर्थिक फसवणूकप्रकरणी अटक -

आपल्यालाही असा मॅसेज आला असेल तर आताच सावधान व्हा!
कारण या प्रकरणावर थेट ताज हॉटेलद्वारेच अधिकृतरित्या स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ताजने हा मॅसेज फसवा आहे आणि दिशाभूल करणारा असल्याचे सांगितले आहे.  त्यांनी ट्विट करून हि माहिती दिली आहे. “एका वेबसाईटच्या माध्यमातून गिफ्ट कार्डद्वारे व्हँलेटाईन आठवड्याला ताज हॉटेलमध्ये मोफत आठवडाभर राहण्याचा दावा करणारा व्हॉट्सएप मॅसेज सध्या फिरतो आहे. आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की, याप्रकारची कसलीही ऑफर ताज हॉटेल किंवा IHCL कडून देण्यात आलेली नाही. यांची नोंद घ्यावी तसेच सावधानी बाळगावी,"  असे ट्विट करून ताज हॉटेलने स्पष्टिकरण दिले आहे.

संबंधित बातम्या