Ganapati Visarjan: पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे शांततेत विसर्जन

Ganapati Visarjan: पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे शांततेत विसर्जन

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे शांततेत विसर्जन पार पडले. डेक्कन येथील महापालिकेच्या हौदामध्ये या पाचही गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जनावेळी बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. पुण्यातील मानाचे पाच गणपतींच्या विसर्जनाचा कार्यक्रम पालिकेच्या वतीने क्रमाने आखण्यात आला होता. त्यानुसार शांतेत आज विसर्जन पार पडले.

पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती. पुणे पालिकेने बांधलेल्या डेक्कन येथील हौदात या मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आलं.

पुण्यातील मानाचे पाच गणपती

कसबा गणपती - विसर्जन - 4:15

तांबडी जोगेश्वरी - विसर्जन - 5:38

गुरुजी तालीम - विसर्जन - 7.22

तुळशीबाग - विसर्जन - 8.02

केसरी वाडा - विसर्जन - 8.50

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com