Ganesh Chaturthi 2021: यंदाही बाप्पा येणार पण भक्तांना भेटणार नाही
Ganesh Chaturthi 2021Dainik Gomantak

Ganesh Chaturthi 2021: यंदाही बाप्पा येणार पण भक्तांना भेटणार नाही

'लालबागचा राजा'चे घरी बसून दर्शन घेता येणार

गणेशोत्सवाबाबत (Ganeshotsav) महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी गणेश भक्तांना गणपती बाप्पाचे थेट दर्शन घेण्याची संधी मिळणार नाही. म्हणजेच गणेश मंडळ किंवा पंडालवर जाऊन भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकारने थेट दर्शनावर बंदी घातली आहे. राज्य सरकारने गणेश भक्तांना यावेळी बाप्पाचे (Ganesh Chaturthi 2021) ऑनलाइन (Online) दर्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना संसर्गाची वाढती रूग्णसंख्या आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज लक्षात घेता राज्य सरकारने पुन्हा एकदा हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने सर्व गणेश मंडळांना ऑनलाईन दर्शन सुविधेचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच, हे स्पष्ट झाले आहे की यावेळी गणेश भक्तांना गणेश मंडळे किंवा पंडालमध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बातमीमुळे मुंबईतील गणेश भक्तांमध्ये निराशा पसरली आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त साजरा होणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. पण कोरोनाचा कहर पाहता राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली.

Ganesh Chaturthi 2021
Oxygenची मागणी वाढल्यास महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?

'लालबागचा राजा'चे घरी बसून दर्शन घेते येणार आहे. कारण ऑनलाईन दर्शन हाच एकमेव मार्ग भक्तांकडे आहे. गेल्या वर्षीही गणेश भक्तांनी घरी राहूनच बाप्पाची पूजा केली. गेल्या वर्षी, कोरोना च्या कडक निर्बंधांमुळे, लोकांनी गर्दी करण्याचे टाळले. यावेळीही भक्तांना लालबागचा राजाचे थेट दर्शन घेण्याची संधी मिळणार नाही. म्हणून यंदाही गणेश मंडळे ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

Ganesh Chaturthi 2021
परमबीर सिंहांचा पाय आणखीनच खोलात, 'या' अहवालाप्रकरणी दिले 5 लाख रुपये

'आरोग्य केंद्र उघडावे की धार्मिक स्थळ उघडावे? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केला होता. मंदिर उघडण्यापेक्षा जनतेचे प्राण वाचवणे महत्त्वाचे आहे, जर जीव वाचला तर सण साजरे करता येइल,' असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com