Ganesh Chaturthi 2021: कोकणवासियांना RT-PCR चे बंधन नाही

ज्या चाकरमान्यांना कोविडची लक्षणे जाणवत असतील त्यांनी स्वत:हून आपली काळजी घ्यावी.
Ganesh Chaturthi 2021: कोकणवासियांना RT-PCR चे बंधन नाही
Ganesh Chaturthi 2021Dainik Gomantak

रत्नागिरी: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपली आहे. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. त्यातच कोकणवासी (Konkan) जगातील कोणत्याही कोपऱ्यात असले तरी ते आपल्या गावी गणपतीसाठी आवर्जून येतात. मात्र कोरोना काळात गावी परतणाऱ्यांना आणि प्रशासनालाही कोविड (Covid-19) नियमांचा विसर पडलाय.

कोविड लसिचे दोन डोस आणि आरटीपीसीआर (RT-PCR) झाली नसेल त्यांना कोरोना चाचणीसाठी सक्‍ती करु नये. ज्या चाकरमान्यांना कोविडची लक्षणे जाणवत असतील त्यांनी स्वत:हून आपली काळजी घ्यावी. आपल्या ग्रामकृतीदलाला याची माहिती द्यावी. स्वत:च्या कुटुंबियांची आणि ग्रामस्थांची काळजी घ्यावी. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नाही, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. चाकरमान्यांनी स्वत:हून ग्रामस्थांसह आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही सामंत यांनी केले.

Ganesh Chaturthi 2021
Ganesh Chaturthi 2021: मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा

गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणार्‍या चाकरमान्यांना दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामकृती दलांना याबाबत तपासणीच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. कोरनाच्या या नियमांमुळे गावांमध्ये गोंधळ किंवा वादविवाद होण्याची शक्यता होती. अगदी रेल्वेस्थानकावरही काही ठिकाणी आरटीपीसीआर किंवा अ‍ॅन्टीजेन टेस्ट केल्या जात होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये येणार्‍या चाकरमान्यांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नाही, असे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्रात अद्याप अठरा वर्षापर्यतच्या मुलांना कोविडचे लसीकरण सुरु झाले नाही. राज्यात अनेकांचे दोन डोस तर काहींचा एकच डोस झालाय.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com