Ganesh Visarjan 2021: राज्यात कोरोनाच्या निर्बंधात रंगला बाप्पांच्या विसर्जनाचा सोहळा

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra)दहा दिवसाच्या मुक्कामानंतर आज गणपती बाप्पाचे राज्यभर विसर्जन होत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन सुरु आहे.
Ganesh Visarjan
Ganesh VisarjanDainik Gomantak

मुंबई: जुहू चौपाटीवर प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

मुंबईच्या (mumbai)पश्चिम उपनगरातील सर्वात मोठ गणपती विसर्जन स्थळापैकी जुहू चौपाटीवरही पालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त करण्यात आला आहे. टेहळणी मनोरे, लाईफगार्ड, कंट्रोल टॉवर चौपाटीवर सज्ज ठेवण्यात आलेत. 10 दिवसापासून विराजमान असलेल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्याची वेळ आलीय. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विसर्जनावर अनेक निर्बंध लाँव्यात आले आहे. नागरिकांनी गर्दी करू नये असे निर्देश देण्यात आलेत.

पुणे : वैभवशाली परंपरेवर विर्जन

आज होणाऱ्या बाप्पाच्या विसर्जनासाठी पुणे (Pune)महानगरपालिका सज्ज झाली आहे. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पोलिसांकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्यात बाप्पाची परंपरागत वैभवशाली विसर्जन मिरवणूक कोरोनामुळे होणार नाहीत. पुण्यात मानाचे 5 गणपती आणि श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती (Rich Dagdushet confectioner Ganpati)सह महत्वाच्या गणपती मंडळांनी मी मंडपातच बाप्पाच्या विसर्जनाच निर्णय घेतला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे विसर्जनादिवशी सर्व दुकाने बंद राहणार आहेत. विसर्जनावेळी सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे पुणेकरांना विसर्जन सोहळा ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल.

Ganesh Visarjan
Ganesh Visarjan 2021: या जयघोषणे लाडक्या बाप्पांला द्या निरोप

नागपूर: राजाची मूर्ती विसर्जनासाठी काढली

नागपूरचा (Nagpur)राजाची विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली आहे. तुळशीबाग परिसरात जयस्वाल कुटुंबियांच्या अंगणात स्थापन करण्यात आलेली 4 फुटी मूर्तीचे नागपूर जवळच्या कोराडी येथे विसर्जन केले जाणार.

औरंगाबाद (Aurangabad):

महानगरपालिकेकडून शहरात 12 विविध ठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

येथे घरगुती गणेशाचे विसर्जन होत आहे. दहा दिवस भक्तीभावाने बाप्पाची पूजा केल्यानंतर आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो आहे

हिंगोली:

बाप्पाच्या विसर्जनासाठी हिंगोली (Hingoli)नगर परिषद सज्ज होवून शहरात सहा कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात एकूण सहा कृत्रिम तलावांची निर्मिती हिंगोली नगर परिषदेने केली आहेत. ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करणे शक्य नव्हते अशा ठिकाणी दोन फिरते कृत्रिम तलावांची निर्मिती करून या कृत्रिम तलावात प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना बाप्पाचे विसर्जन हे थेट आपल्या दारातूनच करता यावे, या हेतूने ह्या संपूर्ण संकल्पना निर्माण केल्या आहेत.

Ganesh Visarjan
Ganesh Chaturthi 2021: गणपती विसर्जन स्थळी जाणाऱ्या पायवाटेची साफसफाई

कोल्हापूर:

बाप्पाच्या विसर्जनामुळे कोल्हापूर शहरात पोलिसांचा (police)मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील कोणत्याही मंडळाला विसर्जन मिरवणूक काढण्यास परवानगी दिली नाही. नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचे संक्रमण वाढू नये याच्यासाठी शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. साधारणत: अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.

दरवर्षी नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक नागपूरकरांसाठी मोठी पर्वणी असते. घोडे, उंट आणि अनेक बॅंड पथकांचा समावेश असलेली लांबच लांब मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकर तुळशीबाग परिसर भरून जात असे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गणेश विर्सजनाच्या वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवून गणेश मूर्तीच्या विसर्जनाचे नियोजन करावे आणि कोरोना संक्रमणाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करून त्यामध्ये सातत्य राखावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com