Ganpatipule: अंगारकी संकष्टी चतुर्थीला भाविकांना मिळणार गणरायाचे दर्शन

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यासह अन्य भागातून मोठ्या प्रमाणात भाविक गणरायाचे दर्शन (Ganesh) घेण्यासाठी येत असतात.
Ganpatipule: अंगारकी संकष्टी चतुर्थीला भाविकांना मिळणार गणरायाचे दर्शन
Ganpatipule Ganesh Temple Dainik Gomantak

रत्नागिरी: गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीला (Chaturthi) अनेक भाविक गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे. कोरोना पूर्णपणे अद्याप गेला नसल्याने प्रशासनाने गणपतीपुळे येथे काही निर्बंध नव्याने जारी करण्यात आले आहे.

त्यानुसार गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गणपतीपुळे लगतच्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास पुढील दोनसक्त मनाई करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना कोरोना नियमांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच बाहेरून येणाऱ्यांना स्टॉल लावण्यास परवानगी नाही. तर दोन डोस घेतलेल्या स्थानिकांना (locals) स्टॉल लावण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

Ganpatipule  Ganesh Temple
महाराष्ट्राच्या सुपुत्राचा शौर्य चक्र देऊन सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील गणपतीपुळे या ठिकाणी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने अन्य भागातून मोठ्या प्रमाणात भाविक गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. अंगारकी निमित्त गणपतीपुळ्यात एक ते सव्वा लाख भाविक दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यत येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com