फक्त 48 तास ED हातात द्या; देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील : संजय राऊत

शिवसेना नेते (Shiv Sena) संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
फक्त 48 तास ED हातात द्या; देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील : संजय राऊत
Sanjay RautDainik Gomantak

शिवसेना नेते (Shiv Sena) संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर राऊत चांगलेच तापलेले दिसत असून, '48 तास ईडी आमच्या हातात देऊन बघा, देवेंद्र फडणवीससुद्धा शिवसेनेलाच मतदान करणार,' असे वक्तव्य राऊत यांनी केले. (Maharashtra Rajya Sabha Election)

किंबहुना, संजय राऊत प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत शिवसेना EDला घाबरत नसल्याचे सांगतात. याआधी राऊत यांनी आरोप केला होता की, "संपूर्ण देशातील केंद्रीय तपास यंत्रणेची वेळ आम्हाला माहीत आहे. जिथे निवडणुका होणार आहेत किंवा राज्य सरकारमध्ये अस्थिरता निर्माण करायची आहे, तेव्हा ईडी आणि सीबीआय पाठवले जाते. पण महाराष्ट्र कधी झुकणार नाही आणि शिवसेना कधी घाबरणार नाही."

Sanjay Raut
'निवडणुकीच्या निकालांनी महाविकास आघाडीतील गंभीर मतभेद उघड झाले' देवेंद्र फडणवीस

निवडणूक आयोगाने भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहापैकी तीन जागा भाजपने जिंकल्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप केला. संजय राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैध ठरवले. आम्ही दोन मतांना विरोध केला मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र निवडणूक आयोगाने भाजपला पाठिंबा दिला."

Sanjay Raut
Rajya Sabha Elections 2022: 4 राज्ये 16 जागा! भाजपचा डाव अन् मविआची लढत

मतमोजणीला 8 तास उशीर

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले, तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी यांनीही विजय मिळवला. . मात्र, एमव्हीएचे संजय पवार हे भाजपच्या धनंजय महाडिक यांच्याकडून पराभूत झाले. भाजप आणि सत्ताधारी MVA युतीने क्रॉस-व्होटिंग आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे (EC) तक्रार केल्यानंतर राज्यातील मतमोजणी सुमारे आठ तासांनी उशीर झाली. क्रॉस व्होटिंगच्या आरोपानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मते रद्द करण्याची मागणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com